Crime News saam tv
देश विदेश

Crime News : चुकीच्या उपचारांमुळे तरुणीचा गर्भपात, मग डॉक्टरने जे केलं ते वाचून चक्रावून जाल

बिहारमधील हाजीपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

वृत्तसंस्था

Hajipur Crime News : बिहारमधील हाजीपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बोगस डॉक्टर दाम्पत्याने त्यांच्या बेकायदेशीर नर्सिंग होममध्ये प्रथम मुलीचा गर्भपात केला. त्यानंतर मुलीची तब्येत बिघडल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी भृण कुत्र्याला खायला दिले. यादरम्यान या तरुणीचाही मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यावर ही बाब उघडकीस आली.

पोलीस तपासात सदर नर्सिंग होम देखील बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे. तसेच या डॉक्टर दाम्पत्याकडे एमबीबीएसची डिग्री नसल्याचेही उघडकीस आले आहे. घटनेनंतर आरोपी डॉक्टर दाम्पत्य फरार झाले आहेत. पोलीस (Police) फरार दाम्पत्याचा शोध घेत आहेत.

वैशाली जिल्ह्यातील बालीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंपापूर अग्रेल येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच्या नातेवाईकांना हे नर्सिंग होम बेकायदेशीर असल्याची माहिती नव्हती. डॉक्टरांनी तरुणीवर उपचार सुरु केले, मात्र तिचा गर्भपात झाला आणि तिची तब्येत बिघडू लागली. यामुळे डॉक्टर (Doctor) दाम्पत्य घाबरले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी भृण आपल्या पाळीव कुत्र्याला खायला दिले.

तर दुसरीकडे मुलीची प्रकृती खालावल्याचे पाहून नातेवाइकांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टर दाम्पत्याच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या डॉक्टर दाम्पत्य फरार आहे त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावणात वांगी का खाऊ नये? जाणून घ्या

Saiyaara: 'सैयारा' चित्रपटासाठी 'ही' बॉलिवूडची फेमस जोडी होती पहिली पसंती

Maharashtra Live News Update: - जायकवाडीच्या नाथसागरात जलपूजन; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन

Railway Ticket Clerk : प्रवाशांची तिकिटासाठी मोठी रांग, तरीही बुकिंग क्लर्क फोनवर बिझी; संताप आणणारा व्हिडिओ

World Lung Cancer Day 2025: फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास सुरूवातीला काय लक्षणं दिसतात? वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT