Beed News : ठाकरे गटाचा मोठा दणका; बीडमध्ये MIM, संभाजी ब्रिगेडसह शिवसंग्रामला मोठं खिंडार

एमआयएम जिल्हाध्यक्षांसह 3 माजी नगरसेवक, संभाजी ब्रिगेड संघटनेचे विभागीय अध्यक्ष ठाकरेंच्या शिवसेनेत
Beed News
Beed NewsSaam Tv

Beed News : बीडमध्ये एमआयएमसह संभाजी ब्रिगेडला मोठं खिंडार पडलंय. उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू झालीय. ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली, एमआयएम माजी जिल्हाध्यक्षांसह 3 एमआयएमचे नगरसेवक संभाजी ब्रिगेड संघटनेच्या विभागीय अध्यक्ष, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत हाती शिवबंधन बांधलंय.

Beed News
Pankaja Munde : पंकजा मुंडेंची बदनामी करणारे आमच्याच पक्षात; भाजपच्या बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

यामध्ये एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष निजाम शेख, अमर शेख (नगरसेवक एमआयएम), हाफिज अश्फाक (नगरसेवक एमआयएम), मुन्ना इनामदार (नगरसेवक एमआयएम), सुदर्शन धांडे (प्रदेश सरचिटणीस शिवसंग्राम महाराष्ट्र), संतोष जाधव (मराठवाडा विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड संघटना), नंदू पिगंळे (शिवसंग्राम बीड), अयुब खॅान पठान (बीड जिल्हा सरचिटणीस एमआयएम), मोमीन जुबेर ( माजी बीड शहर अध्यक्ष एमआयएम), शेख खय्युम इनामदार (माजी बीड जिल्हा अध्यक्ष एमआयएम युवक अघाडी), शेख खदीर (बीड शहर अध्यक्ष सॅा मिल सघंटना) यांचा प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

या सर्वांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर विश्वास ठेवून मुंबईतील (Mumbai) मातोश्रीवर जाऊन प्रवेश घेतलाय. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या बीडमधील (Beed) ठाकरें गटात सामील झालेल्या मावळ्यांना प्रवेश दिलाय.

Beed News
Mla Yogesh Kadam News : संजय कदम शिवसेनेत गेले तर त्यांची ही राजकीय आत्महत्या ठरेल : योगेश कदम

दरम्यान बीड जिल्ह्यात हे सर्व पदाधिकारी महत्त्वाचे समजले जातात. त्यामुळे बीड जिल्ह्यात एमआयएम, संभाजी ब्रिगेड संघटना त्याचबरोबर शिवसेनेला हा मोठा धक्का समजला जात असून ठाकरे गटात आता बीडमधून इनकमिंगला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे देखील मोठे पाठबळ ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com