Mla Yogesh Kadam News : संजय कदम शिवसेनेत गेले तर त्यांची ही राजकीय आत्महत्या ठरेल : योगेश कदम

गत विधानसभा निवडणुकीवेळीच संजय कदम यांचा प्रवेश करून त्यांना तिकीट देण्यात येणार होते. ही बाब खासदार संजय राऊत यांनीच सांगितली होती.
sanjay kadam , yogesh kadam, Kokan News
sanjay kadam , yogesh kadam, Kokan Newssaam tv

Kokan Political News : राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटात गेल्यास त्यांचा शिवसेनेतील प्रवेश ही राजकीय आत्महत्या ठरेल असे मत आमदार याेगेश कदम यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटात संजय कदम यांना खेचण्याचा जोरदार प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. त्याबाबत आमदार याेगेश कदम (mla yogesh kadam) यांना छेडले असता त्यांनी कदम यांनी सेनेच्या विरद्ध केलेले कारनामे सांगितले.

sanjay kadam , yogesh kadam, Kokan News
Kokan News : शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन; राष्ट्रवादीचा माजी आमदार परतणार स्वगृही ?

आमदार याेगेश कदम म्हणाले माजी आमदार संजय कदम यांचे माझ्या समाेर आव्हान आहे हे मी समजत नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा दापाेली मतदारसंघ आहे. या मतदारसंघाने नेहमीच शिवसेने प्रेम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या साेबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर दापाेलीमधील (dapoli) सर्व शिवसैनिकांनी मला साथ दिली.

संजय कदम सन 2013 मध्ये शिवसेनेतून एनसीपीत गेले. त्यावेळी खेड येथील तीन बत्ती नाक्यावर सेनेचा भगवा फाडला हाेता याची आठवण आज याेगेश कदम यांनी करुन दिली. कदम म्हणाले अशा व्यक्तीला उद्धव ठाकरे हे पक्षात प्रवेश देणार म्हणजे ते त्यांचीच विचारधारा संपवत आहेत.

sanjay kadam , yogesh kadam, Kokan News
Sindhudurg Fort : साताऱ्याच्या पर्यटकांचा किल्ले सिंधुदुर्गवर "धिंगाणा"; महिलांना चाेपलं अन् नंतर...

संजय कदम यांचे माझ्यासमाेर काेणतेही आव्हान नाही. ते शिवसेनेत गेले तर ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल. ते शिवसेनेत जाताहेत ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असे याेगेश कदम यांनी नमूद केले. ते ज्या दिवशी प्रवेश करतील त्या दिवशी मी निवांत झोपेन अशी टिप्पणी देखील योगेश कदम यांनी केली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com