Sindhudurg Fort : साताऱ्याच्या पर्यटकांचा किल्ले सिंधुदुर्गवर "धिंगाणा"; महिलांना चाेपलं अन् नंतर...

या घटनेनंतर बेशिस्त पर्यटकांना आवर घालायचा कसा ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
satara, sindhudurg, tourists, police
satara, sindhudurg, tourists, policesaam tv

- विनायक वंजारे

Sindhudurg News : कर देण्या-घेण्याच्या वादातून साता-यातील एका महिलांच्या ग्रुपची आणि मालवण (malvan) येथील स्थानिक महिलेची शुक्रवारी मारामारी झाला. दाेन्हीकडून केस धरुन एकमेंकांना मारहण करण्यात आली. हे प्रकरण पाेलिसांपर्यंत गेल्यानंतर साता-याची (satara) महिलांना नमते घेत मालवणातील कर आकारणी करणा-या महिलांची माफी मागितली. या मारामारीचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल (viral) हाेत आहे.

satara, sindhudurg, tourists, police
Raj Thackeray Parli News : राजप्रेमींचा भाजप, एनसीपीच्या बालेकिल्ल्यात धुडगूस; उत्साहाच्या भरात...

घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मालवणात सातारा येथून आलेल्या महिला पर्यटकांची आणि किल्ले सिंधुदुर्ग (sindhudurg) येथे पर्यटन कर घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची हाणामारी झाली. किल्ले सिंधुदुर्ग येथे पर्यटनासाठी साताऱ्यावरून एक ग्रुप आला होता. यावेळी त्या ग्रुपमधील महिला पर्यटकांनी कर देण्यास नकार दिला व कर आकारणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.

satara, sindhudurg, tourists, police
Kokan News : शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन; राष्ट्रवादीचा माजी आमदार परतणार स्वगृही ?

त्यानंतर दाेन्हीकडून एकमेंकांना मारहाण करण्यास प्रारंभ झाला. साता-याच्या महिला पर्यटकांनी कर वसूल करणा-या महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली व निघून गेल्या. या घटनेनंतर सातारा (satara) येथील पर्यटक किल्ले सिंधुदुर्गचे पर्यटन करून परतल्यानंतर महिला पर्यटक व महिला कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा हाणामारी झाली. (Maharashtra News)

satara, sindhudurg, tourists, police
Bandh : बंद कुणाचाही असाे, दुपारी बारापर्यंतच सहभागी हाेणार; व्यापारी महासंघाचा निर्णय

यानंतर हा वाद मालवण पोलीस स्थानकात पोचला. मालवण पोलीस (police) स्थानकात सातारा येथील महिला पर्यटकांनी त्या महिलांची माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. दरम्यान सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटनासाठी येत असलेल्यांकडून माणशी ५ रुपये कर आकारला जाताे. वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने हा कर आकारला जाताे. शुक्रवारी झालेल्या वादानंतर हे प्रकरणावर माफीनाम्याने मिटले असेल तरी बेशिस्त पर्यटकांना आवर घालायचा कसा ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com