Mehak and pari arrested by police social media
देश विदेश

Mehak Pari Arrested : रीलमध्ये शिव्यांची लाखोली, अश्लिलतेचा कळस; सोशल मीडिया स्टार महक-परीवर अटकेची कारवाई

Social media influencers mehak pari arrested for vulgar content spreading online: सोशल मीडियावर रील्समध्ये शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या आणि अश्लिलतेचा कळस गाठणाऱ्या दोन रीलस्टार तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. महक आणि परी अशी दोघींची नावे आहेत.

Nandkumar Joshi

Mehak Pari Arrested: Vulgar Reels Go Viral, Police Crack Down on Online Obscenity : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर महक आणि परीसह चार जणांना अटक केली आहे. अश्लील कंटेंट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी आयटी अॅक्ट आणि विविध कलमान्वये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर महक आणि परीवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

सोशल मीडिया स्टार महक आणि परी या दोघींवर काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिकांकडून या दोघींविरोधात वारंवार तक्रारी येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षक कृष्ण बिश्नोई यांनी सांगितले की, महक परी 143 या नावानं सोशल मीडियावर त्यांचं अकाउंट आहे. त्यावरून अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात येत होते. महक आणि परी या व्हिडिओंमध्ये आक्षेपार्ह भाषा आणि अश्लील संवाद आणि कृती करत असल्याचा आरोप आहे. संभलसारख्या संवेदनशील जिल्ह्याची बदनामी या दोघींच्या व्हिडिओतून होत असल्याचाही आरोप करण्यात आला होता.

महक आणि परीविरोधात गुन्हा (Mehak and Pari Booked)

स्थानिकांकडून महक आणि परीविरोधात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या दोघींसह चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात आयटी अॅक्ट अंतर्गत कलम ६७ आणि कलम २९४बीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. महक आणि परी या दोघी इन्फ्ल्युएन्सर अश्लील व्हिडिओ आणि शिव्यांचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, अश्लिलता पसरवून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

आरोपींची रवानगी थेट तुरुंगात (Mehak and Pari jailed)

पोलिसांनी महक आणि परीसह चौघा आरोपींना अटक केली असून, त्यांची रवानगी तुरुंगात झाली आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटची तपासणी केली जात आहे. अशा प्रकारे अश्लिलता पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला.महक आणि परी या दोघींनी सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये शिवीगाळ आणि अश्लील हावभाव आहेत. धक्कादायक म्हणजे त्यांचे चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या दोघींनी आतापर्यंत पाचशेहून अधिक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT