Sharad Pawar/Narendra Modi Saam TV
देश विदेश

Breaking News: पंतप्रधान मोदी- शरद पवार भेटीत २०-२५ मिनिटे चर्चा; चर्चेला उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार (Narendra Modi and Sharad Pawar) या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आज, बुधवारी भेट झाली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. त्यांच्यामध्ये जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि काही नेत्यांवर झालेली ईडीची कारवाई या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीमुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपमध्ये (BJP) जोरदार संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. काल, मंगळवारीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay-Raut) यांच्याविरोधात ईडीने मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार आणि मोदी यांच्यात दिल्लीत भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, ही भेट नेमकी कोणत्या कारणाने झाली? कोणत्या मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दुसरीकडे, शरद पवार हे प्रमुख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन बडे नेते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे यासंदर्भात या भेटीत काही चर्चा झाली का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या दोघांमध्ये भेट झाली तेव्हा अन्य कुणीही उपस्थित नसल्याची माहिती आहे.

केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाया महाराष्ट्रात वाढलेल्या असतानाच, शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप नेत्यांकडून होत असतानाच, या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेली भेट महत्वाची मानली जात आहे.

केंद्रीय मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी देखील काल रात्री शरद पवारांच्या दिल्ली येथील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले होते. त्या भेटीला काही तास उलटत नाहीत, तोच आता महाविकास आघाडीचे नेते पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT