Telangana Crime News/Representative Image SAAM Tv
देश विदेश

Hyderabad Crime News : अनाथ मुलीवर सामूहिक अत्याचार; ८ जण घरात घुसले, पीडितेच्या भावाला धमकावले

Telangana Crime News : अनाथ मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना हैदराबादजवळील मीरपेटमध्ये घडली.

साम न्यूज नेटवर्क

Telangana Crime News : अनाथ मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना हैदराबादजवळील मीरपेटमध्ये सोमवारी सकाळी घडली. पीडित मुलगी आणि तिचा लहान भाऊ, तसेच शेजारील तीन लहान मुले घरात होती. त्याचवेळी आठ जण अचानक घरात घुसले. त्यातील पाच जणांनी भावासह लहान मुलाला चाकूचा धाक दाखवून धमकावले. तर तिघांनी मुलीवर अत्याचार केले.

या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध नोंदवून आंदोलन केले. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. (Crime News)

पीडितेच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. तिला एक १४ वर्षांचा भाऊ आहे. काही आठवड्यांपूर्वीच ते दोघेही आपल्या नातेवाईकाच्या घरी मीरपेटमध्ये राहायला गेले. सोमवारी ते दोघे आणि शेजारीत तीन मुलं घरी खेळत होते. अचानक आठ जण त्यांच्या घरात घुसले. त्यातील तिघांनी मुलीला वरच्या मजल्यावर जबरदस्ती घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. तर तिचा भाऊ आणि शेजारील मुलांना पाच जणांनी चाकूचा धाक दाखवला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमुळं प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मीरपेट महापौर पारिजात रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी पीडितेच्या घराजवळील रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संतापलेल्या कार्यकर्त्यांसह रेड्डींना ताब्यात घेऊन अंबरपेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परिसरात पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

एलबी नगरचे डीसीपी बी साई श्री म्हणाले की, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके नेमली आहेत. आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तिचा जबाबही नोंदवून घेण्यात आला आहे.

घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage ) तपासून आरोपींचा माग काढला जात आहे. पीडितेचे कुटुंबीय आणि आरोपींमध्ये जुनै वैर आहे का, याची माहितीही घेतली जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT