Dombivli Crime News: मेकअप करायला आली आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून गेली; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Makeup Artist Stole Bridal Jewellery: डोंबिवलीत साखरपुड्याचा मेकअप करण्यासाठी आलेल्या मेकअप आर्टिस्टने नवरीच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे.
Dombivli Crime News
Dombivli Crime NewsSaam TV
Published On

Dombivli:

साखरपुडा किंवा लग्न समारंभात प्रत्येक नवरी सगळ्यांमध्ये सुंदर दिसण्यासाठी मेकअप करते. आजकाल लग्न समारंभात महागड्या मेकअप आर्टिस्टला बोलावणं ही एक प्रथाच झाली आहे. तुम्ही देखील तुमच्या लग्नासाठी मेकअप आर्टिस्टला बोलावणार असाल तर सावधान. कारण डोंबिवलीत साखरपुड्याचा मेकअप करण्यासाठी आलेल्या मेकअप आर्टिस्टने नवरीच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. (Latest Marathi News)

डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल जवळ सायंकाळी १५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. मुलुंडमधील पूजा गुप्ता या २३ वर्षीय तरुणीचा साखरपुडा करण्यासाठी २ मेकअप आर्टिस्ट आल्या होत्या. अंकिता आणि कल्पना या दोघींना पूजाने मेकअपची ऑर्डर दिली होती. समारंभ सुरू होण्याच्या एक सात आधी या दोघी हॉलवर दाखल झाल्या होत्या. त्यांनी पूजाचा सुंदर मेकअप केला.

Dombivli Crime News
Pune Crime: ५० टोळ्या,२९७ आरोपी... पुण्यात ‘मोक्का' कारवाईचे धडाकेबाज अर्धशतक; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका

मेकअप झाल्यावर नवरी स्टेजवर आली. साखरपुड्यासाठी हॉलमध्ये पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती. या आनंदाच्या क्षणी नवरी आणि नवरदेव दोघेही खुश होते. इकडे सर्व आनंदात असताना नवरीच्या दागिन्यांची बॅग मेकअप रुममध्येच होती. या बॅगेवर अंकिता आणि कल्पना या दोघींची नजर पडली. दागिने आणि रोकड पाहून ते चोरण्याचा त्यांना मोह आवरला नाही.

एकीकडे कार्यक्रम सुरू असताना दोघींनी दागिने आणि रोकडवर डल्ला मारला. काही वेळातच त्या तेथून निघून गेल्या. नवरीचे दागिने घेण्यासाठी जेव्हा एक मुलगी रुममध्ये आली तेव्हा पर्स रिकामी होती. दागिने आणि रोकड चोरी झाल्याचे लक्षात येताच नवरीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Dombivli Crime News
Delhi Crime: मित्राच्या मृत्यूनंतर मुलीवर अत्याचार... सरकारी अधिकाऱ्याचे विकृत कृत्य; मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ निलंबन

दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये अंकिता आणि कल्पना यांची चोरी पकडली गेली. सोनारपाडा परिसरातून या दोघींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com