Indians stuck in Russia Google
देश विदेश

Russia -Ukraine War: रशियात अडकले २० भारतीय; परदेशात नोकरी देतो म्हणून थेट उतरवलं रशिया-युक्रेनेच्या युद्धात

Bharat Jadhav

Mea Randhir Jaiswal Talk on Indians stuck in Russia:

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारतीय अडकल्याची कबुली भारत सरकारने दिलीय. या २० भारतीयांना चांगल्या नोकऱ्या देण्याचं आमिष देत तेथे नेण्यात आल्याचं सरकारने सांगितलंय. हे लोक अजूनही तिथेच अडकले असून त्यांना परत आणले जाणार असल्याचं दावा सरकारकडून केला जात आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असून रशियन अधिकाऱ्यांशीही चर्चा सुरू आहे. रशियात अडकलेल्या या लोकांनीही आमच्याशी संपर्क साधल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले वृत्त लाइव्ह हिंदुस्तान या हिंदी वृत्तसंस्थेने दिले आहे.(Latest News)

रशियात अडकलेल्या २० लोकांना चांगल्या पगाराचे आणि सोयीसुविधांचे आमिष दाखवून रशियात नेण्यात आले. तेथे काही काळ प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना थेट युद्धाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले. ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना वाचवून घरी आणण्याचे आवाहन भारत सरकारकडे केले आहे. भारतीय रशियन सैन्यात सामील झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या लोकांना तेथून हाकलून देण्यात आले आहे अस परराष्ट्र मंत्रालयाने २६ फेब्रुवारी रोजी सांगितलं होतं. दरम्यान या लोकांना भारतात परत आणण्याची तयारी सुरू आहे. तसेच भारतीयांना जबरदस्तीने तिथे ठेवू नये आणि त्यांना मायदेशी पाठवले जावे, असा मुद्दाही रशियन लष्कर आणि सरकारसमोर मांडण्यात आल्याचं भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

रशियात अडकलेल्या भारतीयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुमारे २० लोक रशियामध्ये अडकले आहेत. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापूर्वी आम्ही दोन सूचना जारी केल्या होत्या, ज्यामध्ये भारतीय नागरिकांनी युद्ध क्षेत्रापासून दूर राहावे, असं म्हटलं होतं. भारतीयांना वाचविण्यासाठी आम्ही रशियन अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत.

चर्चेनेच युद्ध थांबवता येऊ शकते – रणधीर

रशिया- युक्रेन युद्धाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताने नेहमीच चर्चा केलीय. सतत चर्चा करणं देखील आवश्यक आहे, ज्यामुळे दोन्ही पक्ष एकाच टेबलवर येऊ शकतात. याद्वारे आपण शांततेसाठी उपाय शोधू शकतो. हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहोत.

रशियात अडकलेल्या भारतीयांविषयी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, भारतीय दूतावासाने या लोकांशी संपर्क साधलाय. तसेच त्यांना लवकरात लवकर भारतात आणता यावे यासाठी रशियन प्रशासनाशीही चर्चा झालीय. दरम्यान खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. यातील काही पीडितांनी ओवेसींकडे मदतही मागितली होती. एका पीडितेने आपल्या कुटुंबीयांशी बोलल्यानंतर सांगितले की, रशियाला पोहोचल्यानंतर त्याला मूलभूत शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर त्याला युक्रेनविरुद्धच्या युद्ध आघाडीवर पाठवण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT