Jamiat Ulema E Hind Chief Maulana Mahmood Madani saam tv
देश विदेश

Maulana Mahmood Madani: जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांचं भाजप-RSS बद्दल मोठं विधान

Jamiat Ulema E Hind Chief Maulana Mahmood Madani: जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्याइतकाच हा देश महमूदचाही आहे.

Chandrakant Jagtap

Jamiat Ulema-e-Hind News: जमीयत उलेमा-ए-हिंदने इस्लामोफोबियाच्या कथित वाढीवर चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार भडकावणाऱ्यांना विशेष शिक्षा करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी जमियतकडून करण्यात आली आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी शुक्रवारी म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्याइतकाच हा देश महमूदचाही आहे.

दिल्लीच्या रामलीला मैदानात जमीयत उलेमा-ए-हिंदच्या 34 व्या अधिवेशनात मौलाना महमूद मदनी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी हे मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, आपले भाजपा-राष्ट्रीय स्वंयेसवक संघाशी कोणतेही शत्रुत्व नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच धर्माच्या आधारे कोणताही भेदभाव होता कामा नये असे ते म्हणाले.

या अधिवेशनात बोलताना मदनी यांनी स्पष्ट केलं की,आरएसएसच्या संस्थापकांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल अनेक आक्षेप आहेत. पण सध्याच्या आरएसएस प्रमुखांनी केलेली विधानांकडे दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. मतभेद दूर करण्यासाठी आरएसएस प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचं स्वागत करतो असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. 'शिक्षणाचे भगवीकरण केले जात आहे. धर्माची पुस्तकं इतरांवर थोपवणे योग्य नाही, हे भारतीय संविधानाला हे धरुन नाही' असेही त्यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

यावेळी बोलताना मौलाना महमूद मदनी म्हणाले की, महमूद यांच्यापेक्षा एक इंच पुढे आहेत. इस्लामचा जन्म झाला. ही इस्लामची भूमी आहे. इस्लाम बाहेरून आला असे म्हणणे चुकीचे ठरेल. इस्लाम हा सर्व धर्मांपैकी सर्वात जुना धर्म आहे. जमियत उलेमा-ए-हिंदने या अधिवेशनात देशातील हेट कॅम्पेन आणि इस्लामोफोबियामध्ये कथित वाढीसह अनेक ठराव पारित केले आहेत.

दिल्लीतील रामलीला मैदानावर संघटनेच्या महाअधिवेशनात मदनी बोलत होते. मौलाना महमूद मदनी यांच्या अध्यक्षतेखाली रामलीला मैदानावर जमियतचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात त्यांनी अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्यांना शिक्षा ठोठावण्यासाटी स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी केली आहे. मुस्लिम समुदायाविरुद्ध द्वेष आणि चिथावणी देण्याच्या घटनांव्यतिरिक्त अलीकडच्या काळात आपल्या देशात इस्लामोफोबियाची वाढ चिंताजनक पातळीवर गेली आहे असा आरोप जमियतकडून करण्यात आला आहे.

जमियत उलेमा-ए-हिंदने इस्लामोफोबिया आणि मुस्लिमांविरुद्ध द्वेष आणि चिथावणीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप केला आहे. हे सर्व डोळ्यासमोर घडत असूनही सरकार गप्प आहे असे देखील जमियतने म्हटले आहे. जमियतने पुढे म्हटले की, देशातील अखंडता कशी सुनिश्चित करता येईल आणि देशाची सकारात्मक प्रतिमा कशी निर्माण करता येईल याकडे सरकारचे लक्ष वेधाण्याचा हा प्रयत्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT