Narayan Rane: 'उद्धव ठाकरेंचे चिन्ह जाईल, एकनाथ शिंदेंना मिळेल', केद्रीय मंत्री नारायण राणेंचा मोठा दावा

Narayan Rane: अडीच वर्षात मातोश्रीसोडून अडीत तास तरी मंत्रालयात बसले का? अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
Narayan Rane
Narayan Ranesaam tv

Narayan Rane: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. 'हे प्रकरण कोर्टात आहे पण भविष्य वर्तवायचे असेल तर उद्धव ठाकरेंचं चिन्ह जाईल आणि एकनाथ शिंदे यांना मिळेल' असा दावा नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

वारीसे प्रकरणावर काय म्हणाले राणे?

पत्रकार शशीकांत वारीसे प्रकरणावर प्रश्न विचारल्यानंतर राणे यांनी पत्रकाराचा काहीही संबंध नाही, चौकशी होईल आणि त्यातून काय ते समोर येईल येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संजय राऊतांना कुणीही धमकी दिलेली नाही, राऊताच्या आरोपांना महत्त्व देत नाही असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. (Latest Marathi news)

Narayan Rane
Uday Samant: "मी राजकारण सोडेन" उदय सामंत यांचं संजय राऊतांच्या आरोपाला उत्तर

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टिका केली. 'शिवसेनेने अडीच वर्षात काय केले? मातोश्रीसोडून अडीत तास तरी मंत्रालयात बसले का? अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आदित्य ठाकरेंचे नाव नका घेऊ, दिवसभर उपवास करावा लागेल असेही ते म्हणाले.

Narayan Rane
Border-Gavaskar Trophy:भारताची दणदणीत सुरुवात! ऑस्ट्रेलियावर मिळवला १ डाव आणि १३२ धावांनी विजय

"पुण्यातील दोन्ही जागा निवडून येणार"

पुण्यातील चिंचवड आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीविषयी बोलताना राणे म्हणाले की, या निवडणुकीत आम्ही विरोधक धुरळ्यासारखे उडवणार आहोत, पुण्यातील भाजपच्या दोन्ही जागा निवडून येणार आहेत. भाजप ग्रामपंचायत असो की लोकसभा सर्व निवडणुका गांभीर्याने घेतो'. तसेच नाना पटोलेंविषीय बोलताना 'नाना पटोले आणि कार्यक्षमता वगैरे म्हणू नका' असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com