Uday Samant: "मी राजकारण सोडेन" उदय सामंत यांचं संजय राऊतांच्या आरोपाला उत्तर

Uday Samant: अनेक लोक आमच्यासोबत फोटो काढतात, फोटो काढला म्हणजे संबंध आहेत असे नाही, हे घाणेरडे आरोप बंद करावे असे सामंत म्हणाले.
Uday Samant
Uday Samantsaam tv
Published On

Uday Samant: मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेला पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणासंदर्भात ट्वीट करून उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर उदय सामंत यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

"माझी एक इंचही जमी तिथे असेल तर मी राजकारण सोडेन आणि ते सिद्ध झालं नाही तर आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं, असे आव्हान देत उदय सामंत यांनी संजय राऊतांवर पलटवार केला केला आहे. तसेच ज्याने हे कृत्य केले त्याचे समर्थन मी करत नाही, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हे मझं मत आहे.

जो कोणी गुन्हेगार आहे, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी पालकमंत्री म्हणून मी स्वत: पाठपुरावा करत आहे, असे म्हणत सामंत यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप धुडकावून लावले आहेत. (Latest Marathi news)

Uday Samant
Sanjay Raut : "पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय" संजय राऊतांचा निशाणा नेमका कुणावर?

माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले, शशिकांत वारीसे यांच्या हत्येचं समर्थन कुणीही करत नाहीये, आरोपीचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. आरोपीला कोणतीही व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आलेली नाही. अनेक लोक आमच्यासोबत फोटो काढतात. फोटो काढला म्हणजे संबंध आहेत असे नाही. हे घाणेरडे आरोप बंद करावे असे सामंत म्हणाले.

पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी गठीत करण्यात येणार आहे.

Uday Samant
Ajit Pawar : राज्यात महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होतायत, सरकार आणि पोलीस काय झोपा काढताहेत? अजित पवार संतापले

बई-गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेला पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटूंबियांसोबतच मराठी पत्रकार संघाने देखील व्यक्त केला होता. त्यानंतर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com