Sanjay Raut : "पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय" संजय राऊतांचा निशाणा नेमका कुणावर?

Sanjay Raut : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv
Published On

Sanjay Raut : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेला पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटूंबियांसोबतच मराठी पत्रकार संघाने देखील व्यक्त केला होता. त्यानंतर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नाणारच्या जमिनींचा व्यवहार बाहेर काढला त्यामुळे वारीसे यांचा खून झाला. वारिशे काही स्थानिक नेत्यांना खुपत होते. फडणवीसांच्या सभेनंतर 24 तासांत त्यांची हत्या झाली, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut
Ajit Pawar : राज्यात महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होतायत, सरकार आणि पोलीस काय झोपा काढताहेत? अजित पवार संतापले

संजय राऊत यांनी ट्वीट करून म्हटले की, "व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी बेनामी जमीन खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर?" असे ट्वीट करत संजय राऊत यांनी उदय सामंत याचा एक फोटो पोस्ट केला आहे.

Sanjay Raut
Sharad Pawar : अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का? शरद पवार स्पष्टच बोलले...

यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यानी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला, कोकणातील एक पत्रकाराला संपवले, तो अपघात झाल्याच दाखवले. हे कोणी केले हे कळले पाहिजे. पोलीस झोपा काढतायत का? सर्वसामान्यांनी कुणाकडे बघावं? कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील? असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले. तसेच येणाऱ्या अधिवेशनात यावर आम्ही आवाज उठवणार असल्याच अजित पवार यांनी औरंगाबादमध्ये बोलताना सांगितले.

संजय राऊत यांच्या ट्वीटवर बोलताना अजित पवार म्हणाले, संजय राऊत यांच्याकडे काय माहिती आहे हे मला माहित नाही. पण कुणाला कोणी धमकावत असेल आणि सातत्याने अशा घटना घडतायत तर हे सरकारचे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com