Earthquake in Delhi Saam tv
देश विदेश

Turkey Earthquake : तुर्कीत भूकंपाचा जोरदार धक्का, इमारती हादरल्या; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Turkey Earthquake update : तुर्कीसहित शेजारी देशांना भूकंपाचा हादरा बसला आहे. या भूकंपामुळे इमारती हादरल्या आहेत. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Vishal Gangurde

तुर्की भूकंपाने हादरलं आहे. तुर्कीत आज बुधवारी दुपारी ६.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाने नागरिकांना मोठा धक्का बसला. तुर्कीतील आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने ही माहिती दिली आहे. या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इस्तांबुलसहित अनेक शहरांच्या इमारतीही हादरल्या. भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

भूकंपाचे हादरे बुल्गारिया, ग्रीस आणि रोमानिया सारख्या शहरालाही बसला. या भूकंपामुळे मोठं नुकसान झालेलं नाही. या भूकंपाचा केंद्र बिंदू इस्तांबूलजवळील मरमारा सागरजवळ होता. भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, भूकंपामुळे काही इमारतीला भेगा पडल्या आहेत. या घटनेनंतर रेस्क्यू टीम अलर्ट झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीत दुपारी ३.१९ वाजता भूकंपाचा हादरा बसला. भुकंपाचा हादरा तुर्कीसहित बुल्की बुल्गारिया, ग्रीस आणि रोमानिया सारख्या शेजारी देशांनाही बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू इस्तांबूलपासून जवळपास ७३ किलोमीटरपासून दूर होता. काही सेकंदाच्या तीव्र झटक्याने लोक घर आणि कार्यालयातून बाहेर पडले.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, भूकंपाच्या झटका इतका तीव्र होता की, इमारती हादरल्यानंतर लोक ओरडत रस्त्यावर उतरले. इस्तांबूल, अंकारा आणि इजमिर सारख्या प्रमुख शहरांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपामुळे अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती हाती आलेली नाही. तसेच वित्तहानी झाल्याची अधिकृत माहिती आलेली नाही. काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या भूकंपामुळे काही जुन्या इमारतींना भेग्या आल्या आहेत.

तुर्कीआधी दिल्लीसहित उत्तर भारताच्या अनेक भागात शनिवारी दुपारी भूंकपाचे सौम्य झटके जाणवले. हा भूकंप शनिवारी दुपारी १२.१८ वाजता झाला होता. भूकंपाचा झटका सोम्य असल्याने कोणत्याही प्रकारची वित्त आणि जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT