Scene of the horrific Uganda highway accident where a bus, truck, and car collided — 63 people lost their lives in the tragic crash. saam tv
देश विदेश

Uganda Accident: महामार्गावर तिहेरी अपघात, दोन बस आणि कारच्या धडकेत ६३ जणांचा मृत्यू , वाहनांचा पूर्ण चक्काचूर

Uganda Accident: युगांडाच्या गुलू सिटी महामार्गावर सकाळी पहाटे तीन वाहनांचा अपघात झाला. या भीषण अपघातात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झालेत.

Bharat Jadhav

  • युगांडामधील गुलू महामार्गावर तिहेरी अपघात झाला.

  • या अपघातात ६३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

  • पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय.

युगांडामध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ६३ जणांचा मृत्यू झालाय. गुलू शहराच्या महामार्गावर बस, ट्रक आणि कारचा तिहेरी अपघात झालाय. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन बस चालकांनी एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दोन्ही वाहनाची धडक झाली. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी तपास सुरू केला आहे.

बुधवारी युगांडामध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला. गुलू शहराकडे जाणाऱ्या महामार्गावर दोन बस आणि इतर दोन वाहनांची टक्कर झाली. या अपघातात किमान ६३ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला आणि अलिकडच्या काळात पूर्व आफ्रिकन देशातील सर्वात भीषण रस्ते अपघातांपैकी एक आहे. या भीषण रस्ते अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

दोन्ही बस विरुद्ध दिशेने जात होते. त्या बसेस समोरून एकमेकांना ओव्हर टेक करत होत्या. त्याच प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यगांडा आणि पूर्वी आफ्रिकेमध्ये वारंवार अपघात होत असतात. रुंद रस्ते नसल्यानं येथे अपघात वारंवार घडतात. पण पोलिसांच्या मते, या अपघातांसाठी वाहनांचा वेग जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे, ऑगस्टमध्ये केनियामध्ये एका अंत्यसंस्कारातून परतणाऱ्या लोकांचा हा अपघात झाला होता. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता.

युगांडामध्ये बुधवारी झालेल्या अपघातातील मृतांची संख्या अजूनही जास्त आहे. रेड क्रॉसच्या प्रवक्त्या इरेन नाकासिता यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. जखमींचे हातपाय तुटले होते आणि रक्तस्त्राव होत होता, असे त्यांनी सांगितले. ही घटना गंभीर स्वरूपाची असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parineeti Chopra: 'सगळ्यात बेस्ट आईला...', राघव चड्ढा यांनी परिणीती चोप्राला खास स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

Bhau beej History: बहिण भावाच्या नात्याचा सण 'भाऊबीज' 'दिवाळीत का साजरा केला जातो? कारण कोणालाच माहित नाही

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टँकरमधून ऑइल गळती, सटासट २२ दुचाकी घसरल्या, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी

बैल पिसाळला, वाहनं अन् नागरिकांना तुडवलं; एकाचा जागीच मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT