Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक २२ जानेवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, २९ महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार

पुण्यासह राज्यात २० जिल्ह्यात होणार ऑनलाईन परिक्षा

लोकसभा, विधानसभा व महापालिका अशा विविध निवडणुकांमुळे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची भरती प्रक्रिया पुढे ढकलली जात होती

कनिष्ठ अभियंता पदासाठी रविवारी ऑनलाइन परीक्षा होणार

विकास गोगावले प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच मोठ विधान

प्रमोद घोसाळकर यांच मोठ विधान

० विकास गोगावले यांची चर्चा होते मग राष्ट्रवादीच्या इतर आरोपींच काय

० विकास गोगावलेंच्या आडून मंत्री भरत गोगावलेंना लक्ष केल जातय

० विकास गोगावले आणि शिवसैनिकांनी वाद केला नाही

बीडच्या विद्यार्थिनीचं थेट उपमुख्यमंत्र्यांना पत्र

पुस्तकांऐवजी विद्यार्थिनीच्या हातात प्रश्न. बीडच्या विद्यार्थिनीने उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिलं. या पत्रात तिने शाळांतील गैरसोयींवर बोट ठेवलं.

कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ३० लाखांचा गोवा बनावट विदेशी दारू साठा जप्त

कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावट विदेशी दारूचा तब्बल १ कोटी ३० लाख ५० हजार रुपयांचा साठा वाहनासह जप्त केला आहे.

खुलताबाद-फुलंब्री रोडवर टेम्पो आणि दुचाकीचा अपघात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद-फुलंब्री रोडवरील गदाना परिसरात लोडिंग टेम्पोने एका मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुशील सुखदेव घुसळे या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक-CM फडणवीस

अखिल भारतीय किसान सभेचे लाल वादळ नाशिकच्या दिशेने...

शेतकरी, आदिवासी आणि ग्रामीण प्रश्नांना घेऊन अखिल भारतीय किसान सभेचे ‘लाल वादळ’ आता चांदवड येथून नाशिकच्या दिशेने मुंबई-आग्रा महामार्गावरून निघाले आहे राज्यस्तरीय 9 आणि स्थानिक अशा एकूण 17 मागण्यांसाठी हा भव्य लॉन्ग मार्च काढण्यात आला असून, प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे

बीडमध्ये किरकोळ कारणांवरून तरुणाला अमानुष मारहाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीच्या घटना काही केल्या थांबायच्या नाव घेत नाहीयेत. किरकोळ कारणावरून एका तरुणाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यानी अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. घटना नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खर्डेवाडी गावात तीन दिवसांपूर्वी घडली आहे.

मुंबई महापालिकेत एमआयएमच्या गटनेते पदी विजय तातोबा उबाळे यांची केली नियुक्ती

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मालेगावला उबाळे यांच्या नावाची केली घोषणा..

मालेगाव महापालिकेत एमआयएम गट नेते पदी माजी महापौर अब्दुल मलिक यांची नियुक्ती

मालेगाव महापालिकेत एमआयएमच्या गटनेते पदी माजी महापौर अब्दुल मलिक यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली.. महापौर पदासाठी इस्लाम पार्टीला पाठिम्बा देण्याबात बैठकीत चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.त्यामुळे mim इस्लाम पार्टीला सपोर्ट करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे व शरदचंद्र पवार गटाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये काळे व पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश....

काळे व पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पंढरपूर तालुक्यात भाजपची ताकद वाढली...

पंढरपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील व भाजपमध्ये होणार थेट लढत.

धुळे मनपा निवडणुकीनंतर ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय एल्गार, 26 जानेवारीला आंदोलनाचा इशारा

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप वगळता सर्वपक्षीय नेते आणि पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे, माजी महापौर भगवान करनकाळ यांच्या नेतृत्वाखाली रचना हॉल येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात असून, ईव्हीएम प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे.

पुण्यात भाजपकडून महापौर पदासाठी या नावांची चर्चा

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तब्बल ९२ महिलांना उमेदवारी देण्यात आली होती यात ६७ विजयी झाल्याअसून महापालिकेत महिला राज असताना आत्ता महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची सोडत निघाली असल्याने भाजपकडून वर्षा तापकीर, मानसी देशपांडे,स्वरदा बापट,स्मिता वस्ते,मंजुषा नागपूरे, ऐश्वर्या पठारे,सायली वांजळे,निवेदिता एकबोटे,या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे...

Ratnagiri: राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

रत्नागिरी- राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

नाणीज पंचायत समिती गणातून डाॅक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून कांबळे बिनविरोध

नाणीज पंचायत समिती गण बिनविरोध करत सामंत यांची व्युव्हरचना

Mumbai - अंधेरीमध्ये शिंदेसेनेचा बॅनर फाडला, या बॅनरवर होता उपमुख्यमंत्र्यांचा फोटो

मुंबई -

मुंबईच्या अंधेरी पश्चिम सात बंगला परिसरात शिवसेना शिंदे गटाचा बॅनर फाडल्याची धक्कादाय घटना घडली आहे

बॅनर वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार रवींद्र वायकर यांच्या फोटो लावण्यात आला आहे

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडला असल्याचा आरोप शिंदे गटाचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर खान यांनी केला आहे

बॅनर फाडणारा व्यक्ती विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात शिंदे गटाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे

वर्सोवा पोलिसांनी फाटलेला बॅनर काढून तक्रारीचा गंभीर दखल घेत परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून बॅनर फाडणारा व्यक्तीच्या शोध घेत आहे

Mumbai: मुंबई मेट्रोच्या कामांचा फटका अंधेरी मरोळ पोलिस कॅम्पला बसला, ३ दिवसांपासून पाणी नाही

मुंबई -

मुंबई मेट्रोच्या कामांचा फटका अंधेरी मरोळ पोलीस कॅम्पला पडला

मागील तीन दिवसांपासून मरोळ पोलीस कॅम्प मधील घरातील नळाला पाणी नाही

मरोळ पोलीस कॅम्प मधील पोलीस कुटुंबीयांमध्ये नाराजी

तीन दिवसांपासून पिण्याचे आणि आंघोळीचे पाणी नसल्यामुळे पोलीस कुटुंबीय हैराण

प्यायला विकत पाणी घ्यावे लागत असल्यामुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये पालिका प्रशासना विरोधात नाराजी

Pune: पुण्यात शिक्षण आयुक्त यांची पत्रकार परिषद सुरू

पुणे -

शिक्षण आयुक्त यांची पत्रकार परिषद सुरू

कॉपीमुक्त अभियान राबवला जाणार

सचिंद्र सिंह घेत आहेत पत्रकार परिषद

नंदुरबार बाजार समितीत ओव्याची मोठी आवक

नंदुरबार बाजार समितीत ओव्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली असून, दररोज सरासरी ९०० क्विंटल ओवा बाजारात दाखल होत आहे. हंगामात पहिल्याच दिवशी ओव्याला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नंदुरबार बाजार समितीत ओव्याला प्रति क्विंटल 10 हजार 600 ते 12 हजार 400 रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.

नंदुरबारात ओल्या लाल मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्याने दरात वाढ

नंदुरबार जिल्ह्यात ओल्या लाल मिरचीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला असून, त्याचा थेट परिणाम मिरचीच्या दरांवर दिसून येत आहे. हंगाम अखेरीस पोहोचल्याने मिरचीच्या दरात वाढ झालीl असून, सध्या बाजारात मिरचीला दोन हजार 450 ते सहा हजार 250 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. दररोज शंभर ते सव्वाशे वाहनांतून मिरचीची आवक होत असून, शेवटच्या टप्प्यात विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र यावर्षी मिरचीची एकूण आवक विक्रमी घटली आहे.

MIM च्या सहर शेख यांना पोलिसांची समज

MIM चे नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी आपल्या भाषणात असे म्हटले होते की पुढच्या पाच वर्षात मुंब्रा हा संपूर्ण हिरवा करू या विरोधात आज किरीट सोमय्या यांनी एक निवेदन मुंब्रा पोलीस ठाण्यात दिले आहे यामुळे पोलिसांनी भाषणात समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील असे भाषण करू नका अशी समज शेख यांनी दिली आहे तशी आम्ही त्यांना नोटीस देखील दिली आहे

किशोरी पेडणेकरांकडून महापौर सोडतीवर आक्षेप

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरसाठी आरक्षण सोडत जाहीर होत आहे

या आरक्षण सोडतीवर उबाठाच्या किशोरी पेडणेकरांकडून महापौर सोडतीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

मुंबई ओबीसीमध्ये का नाही टाकले? - किशोरी पेडणेकर

मुंबईत खुल्या प्रवर्गाचा महापौर होणार

राज्यात नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या

या निवडणुकांचा निकाल लागून आता या २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज सोडत जाहीर होत आहे

मुंबईत खुल्या प्रवर्गाचा महापौर होणार

२९ महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडतीला सुरुवात

राज्यात नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या

या निवडणुकांचा निकाल लागून आता या २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज सोडत जाहीर होत आहे

कल्याण डोंबिवलीत st चा महापौर

अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये भाजप आणि एमआयएमची युती

अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषद मध्ये भाजप आणि एमआयएमची युती...

समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ....

एमआयएमच्या नगरसेवकाला मिळाले शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद.

एमआयएमच्या 3 , अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन

नाशिक जिल्हा प्रशासन आणि भारतीय वायुदलाच्या माध्यमातून आयोजन

गंगापूर धरणाच्या पाण्यावर आकाशात वायुसेनेच्या लढाऊ विमानांच्या विविध कसरती आणि आकाशात साकारणार तिरंगा

मंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, वायुदल, सैन्य दल, पोलीस अधिकारी उपस्थित

एकावेळी तीस हजार नाशिककरांना एरो शो पाहण्याची गंगापूर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात व्यवस्था

Mumbai Goa Expressway: मुंबई गोवा महामार्गावर सिलेंडरने भरलेल्या टेम्पोने घेतला पेट

मुंबई गोवा महामार्गावर सिलेंडरने भरलेल्या छोट्या पिकअप टेम्पोने घेतला पेट

आगीत सिलेंडर चे एकामागोमाग स्फोट

मुंबई गोवा महामार्गावरील पेण जवळील असणाऱ्या वाशी नाका परिसरातील घटना

महामार्गावर भितीचे वातावरण

वाहनातील इंधन लिक झाल्याने अचानक घेतला पेट

अग्निशमन दलाल पाचारण

वाहनातील 8 सिलेंडर सह वाहन जळून खाक

Shahapur: शहापूरजवळ भीषण अपघात; अज्ञात ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू..

राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील शहापूर येथील MIET कॉलेजसमोर रात्री एका भीषण अपघातात ३७ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. एका अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेत दुचाकी चालक असलेला महिलेचा भाऊ देखील जखमी झाला आहे.राणू ऊर्फ अंजुम बबलू शेख (वय ३७, रा. नेहरू वार्ड, मोहाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आशिक अली सैय्यद (वय ४३, रा. दत्तवाडी, नागपूर) हे या अपघातात जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,आशिक अली सैय्यद हे आपल्या मोपेड गाडीने त्यांची आतेबहीण राणू शेख यांच्यासह शहापूरकडून भंडाऱ्याच्या दिशेने जात होते.रात्रीच्या सुमारास MIET कॉलेजसमोर मागून येणाऱ्या एका अज्ञात निळ्या रंगाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात कट मारला.धडक इतकी भीषण होती की, आशिक अली गाडीसह रस्त्याच्या पलीकडे फेकले गेले, तर राणू शेख या ट्रकच्या चाकाखाली आल्या. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक जखमींना मदत करण्याऐवजी ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला.पोलीस सध्या फरार ट्रक चालकाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

आज अमरावतीच्या महापौर पदाचं आरक्षण...

राज्यातील 29 महानगरपालिकाच्या महापौर पदाचं आरक्षण आज निघणार ज्यात अमरावतीचाही समावेश आहे.. मागील चार वर्षांपासून अमरावती महानगरपालिका मधील महापौर यांचं दालन आणि विद्यापीठ मार्गावरील सरकारी बंगल्याला कुकुप लागलेलं आहे.. मनपात असलेलं दालन आज चार वर्षानंतर उघडण्यात आले.. महापौर दालनाच्या खुर्चीवर कोनत्या प्रवर्गाचा महापौर बसेल हे लवकरच कळेल... अमरावती महानगरपालिका मध्ये आज कोणत्या प्रवर्गाचा महापौर राहील हे आज होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतमध्ये कळेल... पण महापौरच्या खुर्चीवर महाविकास आघाडीचा की महायुतीचा महापौर बसेल हे काही दिवसात स्पष्ट होईलच पण भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महापौर त्यांचाच राहील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे....

Dharashiv: धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड

धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड ,सीसीटीव्हीत कारनामा कैद

तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर येत स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसची तोडफोड

बसची तोडफोड करत ईव्हीएम हटाव लोकतंत्र वाचवाचे पोम्प्लेट चिटकवले

आठवडाभरापासून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदूळवाडी इथ ईव्हीएम विरोधात आंदोलन

Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण ७१३ अर्ज दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधून जिल्हा परिषदेसाठी २७३, तर पंचायत समितीसाठी ४४० असे एकूण ७१३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण ५० जिल्हा परिषद गट आणि १०० पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक ६० आणि पंचायत समितीसाठी १०१ अर्ज आले असून याठीकाणी शिवसेना भाजप मध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. तर वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यात जागांच्या संख्येनुसार अर्जांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी, सर्वच जागांसाठी उमेदवारांनी उत्साह दाखवला आहे. आता उद्या 23 तारीखला अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतरच निवडणुकीत खरी रंगत येणार आहे.

Kolhapur: कोल्हापूर महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत

कोल्हापूर महानगर पालिकेच्या नव्या सभागृहातील पहिल्या महापौरपदावर कोण विराजमान होणार, याचा फैसला आज होणार आहे. महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत काढली जाणार असून, याकडे संपूर्ण कोल्हापूर शहरासह इचलकरंजीचेही लक्ष लागले आहे.

Sindhudurg: सिंधुदुर्गात थंडीसह दाट धुक्याची चादर

सिंधुदुर्गात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीने पुन्हा जोर धरला आहे. त्यातच आज ग्रामीण भागासह शहरीभागात दाट धुके पडल्याचे पाहायला मिळाले. मागील दोन तीन दिवसात थंडीही वाढली असल्याने आंबा, काजूच्या फळधारणेसाठी आणखी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र धुक्यामुळे फळांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Lonar Sarovar: लोणार सरोवरातील वाढत्या जल पातळीची उच्च न्यायालयाकडून दखल

जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाण्याची पातळी गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सातत्याने वाढत असून ही पातळी आता रेकॉर्डब्रेक स्तरावर आली आहे. लोणार सरोवरातील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली बुडाली असून वाढत्या जल पातळीमुळे लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म ही बदलत आहे आणि यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. "साम टीव्ही" ने याविषयी रियालिटी चेक करून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता उच्च न्यायालयाकडून याची दखल घेण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्या.अनिल व न्या.राज वाकोडे यांच्या खंडपीठाने वकील म्हणून एड.मोहित खजांची यांची याप्रकरणी न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली आहे व पुढील सात दिवसात रीतसर जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे...

Kolhapur: कोल्हापुरात तीन तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाने मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्यात यशस्वी समझोता झाला आहे. कोल्हापूरात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं. या तीन तालुक्यांतील सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.

Latur: लातूरमध्ये महापौर पदासाठी मंत्रालयात आरक्षण सोडत

लातूर महापालिकेच्या महापौर पदावर कोण बसणार याकडे काही दिवसापासून अनेकांचे लक्ष लागल आहे, दरम्यान आज मुंबईच्या मंत्रालय येथे महापौर पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे , सकाळी 11 वाजता महापौर पदाची सोडत होणार असून अनेकांचे लक्ष या सोडतीकडे लागला आहे. तर लातूर महापालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची एक हाती सत्ता आल्याने नेमकं महापौर पद कोणाकडे जाणार हे देखील महत्त्वाचा आहे.

Ratnagiri: राज्यात पंचायत समितीत शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

रत्नागिरी- राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध

नाणीज पंचायत समिती गणातून डाॅक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून कांबळे बिनविरोध

नाणीज पंचायत समिती गण बिनविरोध करत सामंत यांची व्युव्हरचना

आजच्या शेवटच्या दिवशी कांबळे यांच्या शिवाय एकही उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही

पद्मजा कांबळे यांचा एकमेक अर्ज निवडणुकीत आल्याने त्यांची बिनविरोध निवड

Ratnagiri: रत्नागिरी जिल्हा परिषद 256 आणि पंचायत समितीसाठी 444 उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शेवटच्या दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला. तिकीट न मिळाल्याने काही ठिकाणी बंडखोरी देखील झाली.. जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी 226 तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी तब्बल 444 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक अर्ज चिपळूण तालुक्यात दाखल झाले आहेत.

Ratnagiri: उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक निवडणूक रिंगणात

रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक निवडणूक रिंगणात

नेताजी पाटील पंचायत समिती निवडणूक लढवणार

नेताजी पाटील उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक

कसोप पंचायत समिती गणामधून नेताजी पाटील निवडणूक रिंगणात

Pune: राष्ट्रवादीचे नेते उल्हास तुपे यांच्याकडून दगडफेक; शिवसैनिक जखमी

काही दिवसांपूर्वी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारे दगडफेक करत भ्याड हल्ला केला. शिवसेनेचे हडपसरचे उपसंघटक दीपक कुलाळ यांच्यावर.. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे उल्हास तुपे यांनी त्यांच्या अंगावर स्कॉर्पिओ घालत डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चाळीस-पन्नास गुंडांची टोळी घेऊन त्यांनी या दोन ते तीन शिवसैनिकांवर हल्ला केला. त्यात शिवसेनेचे पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाळ गंभीर जखमी झालेत...हा सर्व प्रकार विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर येथे घडला...या बाबत हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल ..

राष्ट्रवादी नेते उल्हास तुपे यांनी दगडफेक केली . व मुलानी वेपण लावल्याचा आरोप कुलाल यांनी केला आहे.

अमरावती महानगरपालिकेत युवा स्वाभिमान पार्टीच्या गटनेतेपदी ज्ञानेश्वर उर्फ नाना आमले यांची निवड

अमरावती महानगरपालिकेत युवा स्वाभिमान पार्टीच्या गटनेतेपदी ज्ञानेश्वर उर्फ नाना आमले यांची सर्वानुमते निवड...

युवा स्वाभिमान पार्टीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय.

राष्ट्रीय अध्यक्षांकडून नाना आमले यांच्या नावाची शिफारस.

नगरसेवक प्रशांत वानखडे यांचे अनुमोदन, सर्वांचा एकमुखी पाठिंबा.

आमदार रवि राणा यांचा मुंबईवरून फोनद्वारे अभिनंदन;सर्व नगरसेवकांना एकजुटीने काम करण्याच्या सूचना.

महानगरपालिकेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याचा निर्धार.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या लॉकर चोरीचा छडा,चौघांना अटक

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आटपाडी तालुक्यातल्या शाखेत झालेल्या चोरीचा सांगली पोलिसांनी अखेर छडा लावला आहे.चौघांना अटक करत सव्वातीन कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.या प्रकरणी उत्तर प्रदेश मधून एका संशयितासह स्थानिक तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.9 जानेवारी रोजी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील 22 लॉकर गॅस कटरने फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना घडली होती,या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती,अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने प्रकरणी सखोल तपास करत एका मोठ्या चोरीचा छडा लावला आहे.संशयित आरोपीं मध्ये असणाऱ्या पलूस तालुक्यातील एका गलाई कामगाराने या चोरीचा प्लॅन आखल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Bhandara: भंडाऱ्यात पशुसंवर्धन विभागात दुधाळ जनावरांच्या वाटपात मोठा घोटाळा उघड...

ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी विशेष घटक योजनेअंतर्गत खर्च केला. लाखांदूर तालुक्यात अनेक गरजू लाभार्थ्यांना दुधाळ गायी आणि म्हशींचे वाटप करण्यात आले. कागदावर ही जनावरं 'उच्च जातीची' आणि 'भरपूर दूध देणारी' असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जनावरांची खरेदी करताना नेमक्या कोणत्या निकषांचा वापर करण्यात आला? यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांचे संगनमत आहे का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

वैभववाडी पंचायत समितीत भाजपचा उमेदवार बिनविरोध

वैभववाडी पंचायत समितीत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने कोकीसरे मतदारसंघातून भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या पत्नी साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपने वैभववाडी पंचायत समितीत आपले खाते खालले आहे. हा विजय केलेल्या विकास कामांचा विजय असल्याची भावना यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी व्यक्त केली आहे.

Pune: पुण्यात ११० ब्लॅक स्पॉट

पुण्यात ११० ब्लॅक स्पॉट

हडपसर, कात्रज,वारजे परिसरात धोकादायक ठिकाणे

शहरात रस्ते वाहतुकीचा वेग वाढत असताना अपघातांचा धोका ही वाढत चालला आहे

वाहतूक पोलिस आणि प्रशासनाने याकडे गांभरियाने लक्ष देण्याची गरज आहे

महामार्गावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक

Dagdusheth Ganpati Mandir: माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

आज माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे.

या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही जोरदार तयारी करण्यात आली आहे.

गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

दगडूशेठ गणपतीचा मुख्य गणेशजन्म सोहळा यंदा सुवर्ण पाळण्यात पार पडणार आहे.

या निमित्ताने दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिरात मोठी गर्दी केली.

Nagpur: नागपूर शहरातील 171 चौकावर असणार एआयची नजर..

शहरातील वाहतूक कोंडी, नियमतोडणाऱ्यावर आणि अपघातावर आळा घालण्यासाठी मनपाकडून इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या अत्याधुनिक एआय आधारित प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार..

या माध्यमातून शहरातील 171 चौकात एआयचा पहारा असणार.

मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी पोलिस कमांड कंट्रोल सेंटर आणि लेडीज क्लब चौक येथे प्रतक्ष पाहणी करत आढावा घेतला..

सोबतच वाहतूक नियमाचे उल्लंघन होताच प्रणाली कशा प्रकारे तात्काळ प्रतिसाद देते याची प्रतक्ष चाचणी घेतली...

शहरातील 171 चौकात आयआयटीएमएस प्रणाली बसविण्यात येणार असुन त्यासाठी कंट्रोल सेंटरमध्ये अत्याधुनिक आणि सायबर सुरक्षित सर्व्हर प्रणाली उभारण्यात येणार आहे..

Pune ZP Election: पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागा साठी ५९७ उमेदवारी अर्ज दाखल

पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागा साठी ५९७ उमेदवारी अर्ज दाखल

चार वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विविध पक्षाच्या पदाधिक कार्यक्रम शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल

पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी ९०७ उमेदवाराने १६६ अर्ज दाखल केले आहेत

आज अर्जांची छाननी होणार आहे २७ जानेवारीला माघार घेण्याची मुदत आहे

पुणे जिल्हा परिषद निवडणूक ही गाजणार..

Yavatmal: दीड लाख घरकुलांना मिळणार 11 हजार ब्रास मोफत वाळू

प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यात एक लाख 60 हजार 374 घरकुलाचे बांधकाम सुरू आहे या घरकुलधारकांना पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे मात्र त्यानंतर बांधकाम करण्यासाठी लागणारा निधी अनेक घरकुल धारकांना मिळाला नव्हता यातच घरकुल साठी लागणारी वाळू उपलब्ध न झाल्याने अनेकांचे बांधकाम थांबले होते आता नवीन वाळू धोरणांमधून 11 हजार ब्रास वाळू राखीव ठेवण्यात आले आहे यामुळे घरकुलधारकांना मिळणाऱ्या मोफत वाळूचा प्रश्न निकाली निघाला आहे.

Maharashtra Live News Update : म्हाडा मुंबई मंडळाच्या ८४ अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

म्हाडा मुंबई मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ८४ अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावासाठी ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्याची मुदत २ फेब्रुवारी २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. पात्र अर्जदारांसाठी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाइन बोली प्रक्रिया होणार असून ५ फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाईल. मुलुंड, कुर्ला, पवई, जोगेश्वरी, गोरेगाव, मालवणी व चारकोप येथील गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सुधारित दरानुसार गाळ्यांच्या किमतीत घट करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज व अटी उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com