Bangladesh factory fire Saam tv
देश विदेश

Shocking : कापडाच्या कारखान्यात आग, १६ जणांचा होरपळून मृत्यू, कुठे घडली घटना?

Bangladesh factory fire : कापडाच्या कारखान्यात आग लागल्याची घटना घडली. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

बांगलादेशमध्ये कापडाच्या कारखान्यात भीषण आग

या आगीत १६ लोकांचा झाला होरपळून मृत्यू

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

बांगलादेशच्या राजधानी ढाकामधून मोठं वृत्त हाती आलं आहे. मीरपूर येथील रुपनगरमध्ये कापडाच्या कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक जण घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

कपडा कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या घटनेत कारखान्याच्या दुसरी आणि तिसऱ्या मजल्यावर एकूण १६ मृतदेह आढळले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शीच्या माहितीच्या आधारे महत्वाची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, ढाकाच्या मीरपूर भागातील ७ मजली कारखान्याच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमारास आग लागली. काही क्षणात ही आग वाऱ्यासारखी पसरली. ही आग केमिकलच्या खोलीपर्यंत पोहोचली. या खोलीत ब्लिचिंग पाऊडर, प्लास्टिक सामग्री आणि हायड्रोजन पेरोक्साइड ठेवलं होतं.

बांगलादेशाच्या अंतरिम सरकारच्या प्रमुख मुहम्मद यूनुस यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आगीमागचं कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी दुर्घटनेतील जखमींना तातडीने मदत करण्याचेही आदेश जारी केले आहेत.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कारखान्यात होरपळून मृत्यू झालेल्या व्यक्तींची ओळख पटलेली नाही. कारखान्यात स्फोट झाल्यानंतर सर्वत्र विषारी गॅस पसरला. त्यामुळे कारखान्यातील १६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यातील अनेक कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना तातडीने ढाकाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी विभागात दाखल केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वैजापूर येथे शिवसेनेचा मेळावा, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संदिपान भुमरे उपस्थित राहणार

Mumbai Monorail : ट्रायल रनमध्येच मोनोरेलमध्ये बिघाड, MMRDAच्या 'आधुनिक तंत्रज्ञाना'चा बोजवारा | पाहा VIDEO

Jayant Patil : 'अपक्ष खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका', जयंत पाटलांचा विशाल पाटलांना थेट टोला

Rahul Gandhi H-Files : राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब, ब्राझिलच्या मॉडेलचे नाव घेत भाजपवर पुराव्यासह गंभीर आरोप

शिवसेना शिंदेसेनेला भाजपकडून जोरदार झटका; दोन बड्या नेत्यांची कमळाला साथ, काँग्रेसलाही खिंडार

SCROLL FOR NEXT