Odisha Hospital Fire Saam Tv
देश विदेश

Fire In Hospital: मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये अग्नीतांडव, १० रुग्णांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Odisha Hospital Fire: ओडिशामध्ये हॉस्पिटलला भीषण आग लागून १० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आग कशी लागली याचा तपास केला जात आहे.

Priya More

Summay:

  • ओडिशाच्या कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भीषण आग

  • आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत होरपळून १० रुग्णांचा मृत्यू

  • शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलमध्ये आग लागल्याचा संशय

  • ओडिशा सरकारने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले

ओडिशामध्ये मोठी दुर्घटना घडली. हॉस्पिटलला आग लागल्यामुळे १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ओडिशाच्या कटकमध्ये घडली. सोमवारी मध्यरात्री एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला अचानक आग लागली. या आगीमध्ये अनेक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग कशी लागली यामागचे कारण शोधले जात आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलला आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीमध्ये १० रुग्णांचा मृत्यू झाला. तर ५ रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांवर याच हॉस्पिटलच्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी रुग्णांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री मोहन मांझी हॉस्पिटलमध्ये पोहचले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मध्यरात्री अडीच ते तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तर अधिकाऱ्यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर असलेल्या रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला.

ओडिशाचे मुख्यमंत्री कार्यालय सांगिलतले की, 'एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्यावर कोणत्याही व्यतयाशिवाय उपचार करण्यात यावे असे आदेश दिले.

दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली आणि त्यांना पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आरोग्य विभाग आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सर्व जखमी आणि बाधित रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cylinder Blast: किचनमध्ये अचानक सिलिंडरचा ब्लास्ट, आई-बाप अन् ३ महिन्याच्या बाळाचा जिवंत जळून मृत्यू

Maharashtra News Live Update: पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात स्वच्छता कंत्राटावरून वाद, संस्थेला नोटीस

Ashok Kharat Case: बायको कुठे देवालाच माहित...; अशोक खरातचं पोलिस कोठडीत उत्तर

Yuzvendra Chahal Viral Chat: युजवेंद्र चहलनं अभिनेत्रीला केला होता मेसेज, तिने ऑन कॅमेरा दाखवले चॅट्स, VIDEO व्हायरल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत आज महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT