Sindhudurg Tourism : कोकणचा गौरव! 'विजयाचा किल्ला' म्हणून ओळखले जाते 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

विजयदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड शहराच्या जवळ आणि मुंबईपासून सुमारे ४८५ किमी अंतरावर वसलेला आहे. विजयदुर्ग किल्ला हा ८०० वर्षे जुना ऐतिहासिक जलदुर्ग आहे.

Sindhudurg | google

विजयदुर्ग किल्ला

विजयदुर्ग किल्ल्याला 'विजयाचा किल्ला' म्हणून ओळखले जाते. तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेला विजयदुर्ग किल्ला 'कोकणचा जिब्राल्टर' म्हणून ओळखला जातो.

Vijaydurg Fort | google

ट्रेकिंगचा प्लान

२७ बुरुज, तीन-स्तरीय तटबंदी आणि २०० मीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठी विजयदुर्ग किल्ला आहे. तुम्ही येथे मित्रांसोबत ट्रेकिंगचा प्लान करू शकता.

Planning a Trek | google

किल्ला कोणी बांधला?

विजयदुर्ग किल्ला राजा भोज यांनी बांधला होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नूतनीकरण केले. मराठा आरमाराच्या इतिहासातील मोक्याचे ठिकाण आहे.

Fort | google

इतिहास

विजयदुर्ग किल्ला हा मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा एक भक्कम तळ होता. ज्यामुळे युद्धनौकांना जवळच्या वाघोटन/खारेपाटण खाडीमध्ये लपवून ठेवणे शक्य होत असे.

History | google

सिंधुदुर्गमधील ऐतिहासिक ठिकाणे

सिंधुदुर्ग येथे अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. ज्यात सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग, रेडीचा गणपती, सावंतवाडी राजवाडा आणि कुणकेश्वर मंदिर यांचा समावेश आहे.

Historical Places in Sindhudurg | google

अभेद्य जलदुर्ग

विजयदुर्ग किल्ला एक अभेद्य जलदुर्ग असून, येथे उत्कृष्ट वास्तुकला पाहायला मिळते. तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे नक्की जा.

Sea Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Vijaydurg sea Fort | google

NEXT : ७५० पायऱ्यांचा थरारक प्रवास, संभाजीनगरमधील 'हा' किल्ला शत्रूंना जिंकता आला नाही

Sambhajinagar Tourism | google
येथे क्लिक करा...