Sambhajinagar Tourism : ७५० पायऱ्यांचा थरारक प्रवास, संभाजीनगरमधील 'हा' किल्ला शत्रूंना जिंकता आला नाही

Shreya Maskar

संभाजीनगर

दौलताबाद किल्ला ज्याला देवगिरी किल्ला म्हणूनही ओळखले जाते. दौलताबाद किल्ला हा १२ व्या शतकातील २०० मीटर उंच शंकूच्या आकाराच्या टेकडीवर वसलेला अत्यंत अभेद्य गिरीदुर्ग आहे.

fort | google

दौलताबाद किल्ला कोणी बांधला?

दौलताबाद किल्ला (देवगिरी) यादव वंशातील राजा भिल्लम V याने ११८७ च्या सुमारास बांधला. छत्रपती संभाजी नगरजवळील हा अभेद्य किल्ला यादव साम्राज्याची राजधानी होता. ज्याचे नंतर मुहम्मद बिन तुघलकने 'दौलताबाद' असे नामकरण केले

Daulatabad Fort | google

७५० पायऱ्या

दौलताबाद किल्ल्याच्या शिखरावर जाण्यासाठी सुमारे ७५० पायऱ्यांचा अंधारी आणि गुंतागुंतीचा मार्ग आहे, जो शत्रूला चकवा देण्यासाठी बनवला होता. हा एक अभेद्य गिरीदुर्ग आहे. किल्ला शत्रूंना जिंकता आला नाही.

750 Steps | google

तटबंदी

दौलताबाद किल्ल्याला तीन तटबंदींनी वेढलेले आहे. यात अंबरकोट , महाकोट आणि बालाकोट किंवा काळाकोट यांचा समावेश आहे.

Fortifications | google

स्थापत्यशैली

दौलताबाद किल्ला हा मध्ययुगीन लष्करी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हा किल्ला यादव, बहमनी आणि मुघल शैलींचे मिश्रण दर्शवतो. अभेद्य तटबंदी, खंदक, गुंतागुंतीचे वळणदार रस्ते, गुप्त मार्ग आणि भक्कम बुरुज ही याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

Architectural Style | google

पर्यटन स्थळे

दौलताबाद किल्ल्याजवळ वेरूळ लेणी, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर मंदिर, आणि भद्रा मारुती मंदिर यांचा समावेश आहे. किल्ल्याच्या आत चांद मिनार आणि चीनी महाल आहेत.

Caves | google

कसं जायचं?

छत्रपती संभाजी नगर स्टेशनला उतरून तुम्ही टॅक्सी, ऑटो-रिक्षा किंवा बसने दौलताबाद किल्ल्याजवळ जाऊ शकता. ज्यासाठी अंदाजे ३०-४० मिनिटे लागतात.

How ​​to Get There? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

fort | google

NEXT : कोकण कड्याची भव्यता अन् सह्याद्रीतील थरार; करा 'या' ऐतिहासिक किल्ल्याचा रोमांचक प्रवास

Ahilyanagar Tourism | google
येथे क्लिक करा...