Shrinagar Naugam Police Station Blast Saam
देश विदेश

पोलीस ठाण्यात स्फोट नेमका कसा झाला? फरिदाबाद कनेक्शन उघड, डीजीपींकडून मोठा खुलासा

Shrinagar Naugam Police Station Blast: श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्याच्या परिसरात अमोनियम नायट्रेटचे निरीक्षण सुरू असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

Bhagyashree Kamble

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोट प्रकरण ताजे असतानाच जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथेही असाच एक प्रकार घडला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट जैश ए मोहम्मदच्या 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल' च्या तपासाशी संबंधित नौगाम पोलीस ठाण्याच्या परिसरात झाला. स्फोटाच्या भीषण दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. विशेष हा स्फोट एअरपोर्ट परिसराच्या अगदी जवळ, रावलपोरा, नौगाम भागात झाला असून, एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, अनेक जण जखमी आहेत.

रात्रीच्या सुमारास झाला स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अंदाजे ११ वाजून २० मिनिटांच्या सुमारास नौगाम पोलीस ठाण्याच्या आवारात हा स्फोट झाला. एफएसएल टीम, पोलीस आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील अमोनियम नायट्रेटचे निरीक्षण सुरू असताना हा निरीक्षण सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. यामुळे ही घटना कोणत्याही दहशतनाही हल्ल्याशी संबंधित नसून तपासाच्या प्रक्रियेदरम्यानच स्फोट झाल्याची माहिती आहे.

नौगाम पोलीस ठाण्यात झालेला हा स्फोट अत्यंत भयानक होता. त्याचा मोठा आवाज परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. उल्लेखनीय म्हणजे श्रीनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच जैश ए मोहम्मदच्या टेरर मॉड्यूलचा भंडाफोड केला होता. देशातील विविध भागांतून डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणातील संशयितांची चौकशीग नौगाम पोलीस ठाण्यात सुरू होती.

आठ जण जखमी

हरियाणातील फरीदाबाद येथून जप्त केलेल्या विस्फोट सामग्रीचे नमुने तपासासाठी नौगाममध्ये आणण्यात आले होते. या स्फोटात किमान आठ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून, फायर ब्रिगेड पॅरामिलिटरी दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नौगाम पोलीस ठाण्यातील स्फोटाबाबत माहिती देताना जम्मू काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात म्हणाले की, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी फरीदाबाद येथून जप्त करण्यात आलेले स्फोटक पदार्थ, रसायने जम्मू काश्मीरमध्ये आणण्यात आले. नौगाम पोलीस ठाण्याच्या मोकळ्या जागेत सुरक्षितपणे साठवण्यात आले. या साहित्याचे नमुने फॉरेन्सिक टीमकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले होते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Farmers In Crisis: केळी उत्पादक संकटात; हजारो टन केळी शेतातच सडली|VIDEO

Accident News : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ४० प्रवासी जखमी

Orange Peel : संत्री खाल्ल्यावर सालं फेकून देताय? मग थांबा! घरगुती कामांसाठी करा 'असा' उपाय

आईच्या मैत्रिणीवर जीव जडला, आधी प्रेम नंतर बसमध्ये हत्या; मृतदेहाचे तुकडे करून गटारात फेकले

धनंजय मुंडेंनी जरांगेंचं आव्हान स्वीकारुन नार्को टेस्ट करावी; कुणी केली मागणी? VIDEO

SCROLL FOR NEXT