A powerful 8.7 magnitude earthquake shakes Russia’s Kamchatka; tsunami warning issued in Pacific coastal regions including Japan and Hawaii. Saam TV News Marathi
देश विदेश

Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

8.7 magnitude earthquake in Kamchatka Russia today : रशियातील शक्तिशाली भूकंपानंतर आतापर्यंत कोणतीही जिवीतहानीची नोंद नाही, काही जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. जपान, अमेरिका (हवायसह) या देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

  • रशियाच्या कामचटकामध्ये ८.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

  • भूकंपामुळे जपान, हवाय येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

  • काही भागांत १३ फूट उंचीच्या लाटा; रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर.

  • हॉनोलूलूमध्ये सायरन वाजले, वाहतूक कोंडी निर्माण झाली.

Tsunami warning issued after Russia earthquake : रशियामध्ये ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. त्यामुळे जपान, अमेरिकामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रशियातील कामचटका येथे विध्वंसक भूकंपाचे केंद्र आहे. स्थानिक वेळेनुसार, सकाळी ८.२५ वाजता रशियात भूकंपाचे तीव्र हादरे जाणवले आहेत. भूकंपाचा व्हिडिओ समोर आलाय, त्यामध्ये जमीन हादरताना दिसत आहे. विध्वंसक भूकंपामध्ये आतापर्यंत जिवीतहानीचे कोणतेही वृत्त समोर आलेले नाही. काही जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. जपानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यान भूकंपाचे हादरे जाणवत आहेत, त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी ८.२५ वाजता (स्थानिक वेळेनुसार) रशियाच्या कामचटकामध्ये ८.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपानंतर या भागात 4 मीटर उंचीच्या त्सुनामी लाटांनी धडक दिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंप १९.३ किमी खोलीवर झाला. परंतु रशियाच्या कामचटका भागातील त्याच्या परिणामांबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. भूकंपशास्त्रज्ञ शिनिची साकाई यांनी सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू उथळ असल्यास दूरच्या भूकंपांमुळेही जपानमध्ये त्सुनामी येऊ शकते.

रशियातील शक्तिशाली भूकंपाबद्दल आतापर्यंत कोणकोणती माहिती समोर आली?

  • रॉयटर्सच्या माहितीनुसार, भूकंपानंतर तब्बल १३ फूट उंचीच्या त्सुनामी लाटा आल्या. आपत्कालीन परिस्थिती मंत्री सर्गेई लेबेदेव यांनी रहिवाशांना किनारपट्टीपासून दूर जाण्याचे आवाहन केले.

  • रशियाच्या सुदूर पूर्व किनारपट्टीवरील मोठ्या भूकंपानंतर उत्तर जपानमध्ये सुमारे ३० सेंटिमीटर (एक फूट) उंचीची त्सुनामी लाट आढळली. ही लाट जपानचा मुख्य उत्तरेकडील बेट असलेल्या होक्काइडोला धडकली.

  • देशाच्या उत्तर आणि पूर्व किनारपट्टीवर, ओसाका जवळील वाकायामा पर्यंत, तीन मीटरपर्यंतच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

  • भूकंप आणि त्यानंतरच्या त्सुनामीमुळे स्थलांतर झाले. या भागात इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

  • हा गेल्या काही दशकांतील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे, असे गव्हर्नर व्लादिमीर सोलोदोव यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले.

  • रशियाच्या सुदूर पूर्व किनारपट्टीवरील 8.7 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर हॉनोलूलूमध्येही सुनामीचा इशारा देणारे सायरन वाजले आणि रहिवाशांना उंच जागेवर जाण्याचा सल्ला देण्यात आला.

  • हॉनोलूलूमधील काही भागांत वाहतूक कोंडी झाली. ओहू बेटावरील वायनाई या किनारी समुदायातून स्थलांतरासाठी डोंगराळ मार्ग उघडण्याची तयारी अधिकाऱ्यांनी केली.

रशियात कोणत्या भागात भूकंप झाला?

रशियाच्या कामचटका भागात ८.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला.

भूकंपाची तीव्रता किती होती?

भूकंपाची तीव्रता ८.७ रिश्टर स्केल इतकी होती.

कोणत्या देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला?

जपान, अमेरिका (हवायसह) या देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT