Bareli Protest  Saam tv
देश विदेश

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Bareli Protest update : उत्तर प्रदेशच्या बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ झाला. याठिकाणी शेकडो आंदोलक रत्यावर उतरले. यावेळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर मोठा गोंधळ झाला. नमाजानंतर शेकडो आंदोलक 'आय लव्ह मोहम्मद'चा बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले. रत्यावर गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेने बरेलीतील वातावरण तापलं आहे.

बरेलीत शुक्रवारची नमाज झाल्यानंतर 'आय लव्ह मोहम्मद' वादावरून मुस्लीम समाजातील लोकांनी आंदोलन केलं. बरेलीतील वेगवेगळ्यात भागातील लोकांनी शेकडोंच्या संख्येने पोस्टर बॅनर घेत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचाही प्रयत्न केला.

बरेलीच्या श्यामजंग भागात आंदोलनाकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी श्यामगंज भागात दुकाने बंद करण्यास सांगितली. यावेळी नौमहला मशिदीबाहेर मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जमा झाले. आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर शेकडो आंदोलनकर्त्यांची घटनास्थळावरून धावाधाव झाली.

मौलाना तौकीर रजा हे 'आय लव्ह मोहम्मद' प्रकरणात जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निवेदन देणार होते. मात्र, मौलानांनी आंदोलनांची घोषणा केली. यानंतर उत्तर प्रदेश पोलीस हायअलर्टवर होते. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.

नेमकं काय घडलं?

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामिया मैदान आमि बिहारीपूर या दोन्ही भागांना शुक्रवारी सकाळी छावणीचं स्वरुप प्राप्त झालं. श्यमगंज मंडी येथील रोडवर बॅरिकेटसहित पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपार होताच लोक घरातून बाहेर पडले. त्यानंतर परिसरात वातावरण तापू लागलं होतं. दुपारच्या नमाजनंतर आंदोलक रस्त्यावर उतरले.

या आंदोलकांनी रस्त्यावर जोरदार नारेबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. पुढे काही क्षणात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT