uttar pradesh crime Saam tv
देश विदेश

लग्नाला नकार दिल्याने बॉयफ्रेंड भडकला; गर्लफ्रेंडवर घरात घुसून गोळ्या झाडल्या

uttar pradesh Crime : लग्नाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची घरात घुसून हत्या केली. हत्येच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

लग्नास नकार दिल्याने बॉयफ्रेंडने तरुणीला संपवलं

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील तरुणीचा जागीच मृत्यू

आरोपी कृष्णा हा बिहारचा आहे. हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केलीत

उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये २५ वर्षीय गर्लफ्रेंडची बॉयफ्रेंडने गोळ्या झाडून संपवल्याची घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची हत्या केल्याचं समोर आलं आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत.

तरुणीची हत्या झाल्याची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. आरोपी कृष्णाने तरुणीच्या घरात घुसला. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात त्याने तरुणीची गोळ्या झाडून हत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कृष्णाविरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांचे अनेक पथक त्याच्या मागावर आहेत. या प्रकरणी पुढील तपास देखील सुरु केला आहे.

तरुणी ही अमरोहा येथील राहणारी होती. आरोपी कृष्णा हा मूळचा बिहारचा होता. दोघेही एकत्र कारखान्यात कामाला होते. एकत्र काम करत असताना मैत्रीचं रुपांतर प्रेमात बदललं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. या प्रकरणातील आरोपी कृष्णाला लवकरच अटक करू, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये नेमकी काय घटना घडली?

लग्नाला नकार दिल्याने बॉयफ्रेंड कृष्णाने २५ वर्षीय तरुणीची घरात घुसून हत्या केली. आरोपीने तिला गोळ्या झाडून संपवलं

आरोपी कृष्णा मूळचा कोणत्या राज्याचा आहे?

हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार

ऐन निवडणुकीत अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये जुंपली; कोण काय म्हणालं? VIDEO

Acid drinking accident: पाणी समजून अ‍ॅसिड प्यायला, तोंडापासून ते घशापर्यंचा भाग जळाला; डॉक्टरांनी वाचवले २ वर्षांच्या चिमुकल्याचं प्राण

Marathi Actor Death: मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा; हरहुन्नरी अभिनेता- दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

Suraj Chavan Video : हातावर किस अन् मांडीवर बसवलं...; सूरज चव्हाणचा बायकोसोबत रोमँटिक अंदाज

SCROLL FOR NEXT