Marriage Fraud Crime News Saam TV
देश विदेश

Marriage Fraud: थाटामाटात लग्न लागलं, दुसऱ्याच दिवशी नवरी खोलीतून ओरडत आली; सत्य कळताच लग्नघरी सन्नाटा

Marriage Fraud News: सकाळी सासरकडील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना नववधू वराच्या खोलीतून आरडाओरड करत बाहेर पडली आणि गोंधळ घालू लागली.

साम टिव्ही ब्युरो

Marriage Fraud News: धुमधडाक्यात लग्न लागलं, वऱ्हाडी मंडळी दणक्यात जेवली. मनावर भलामोठा दगड ठेवून वडिलांनी आपल्या लाडक्या लेकीला माहेरी पाठवलं. घरात नववधूचं आगमन झाल्यानंतर आनंदाचं वातावरण होतं. रात्री उशीर झाल्यामुळे सर्वजण झोपायला गेले.

सकाळी सासरकडील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना नववधू वराच्या खोलीतून आरडाओरड करत बाहेर पडली आणि गोंधळ घालू लागली. काय झालंय, नववधू अशी का वागतेय? तिला नेमकं काय झालंय?  (Breaking Marathi News)

हे कुणालाही कळालं नाही. अखेर वराच्या कुटुंबीयांनी तिच्या माहेरच्या मंडळींना बोलावलं. त्यानंतर जे सत्य कळालं हे ऐकून वराकडील मंडळींच्या पायाखालची जमीनच सरकली.

मथुरा शहरातील वृंदावनमध्ये ही विचित्र घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील गौरा नगर येथील रहिवासी असलेल्या आनंद यांचे लग्न हरियाणातील होडल येथील रहिवासी लखन यांची मुलगी रेखासोबत निश्चित झालं होतं. (Latest Marathi News)

१० मे रोजी लग्नाची तारीख ठरली. ठरलेल्या तारखेला आणि वेळेत दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले. ११ मे रोजी सकाळी रेखाला घेऊन सासरच्या घरी पोहोचली आणि तिथे गोंधळ घालू लागला.

तिने विचित्रपणे वागण्यास सुरुवात केली. काही वेळातच संपूर्ण परिसरात चर्चा होऊ लागली. त्यानंतर वरपक्षाने तात्काळ वधूच्या नातेवाईकांना बोलावलं. या प्रकाराची माहिती मिळताच नवविवाहितेचा भाऊ विनोद आपल्या आई-वडिलांसह नवऱ्या मुलाच्या घरी पोहचला.

यानंतर रेखाच्या भावाने जे सत्य सांगितलं ते ऐकून साऱ्यांना धक्का बसला. रेखा ही गतीमंद होती. तिच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते.लग्नानंतर ती ठिक होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. म्हणून आम्ही तिचे तातडीने लग्न लावलं असं, रेखाचा भाऊ विनोद याने सांगितलं.

हे ऐकून वरांकडील मंडळींना मोठा धक्का बसला. लग्नघरात (Marriage Fraud) भयान शांतता पसरली. काही वेळापूर्वी जिथे आनंद साजरा केला जात होता, तिथे आता दु:खाचं वातावरण पसरलं होतं. आता पती आनंदने नववधूच्या घरच्यांवर सत्य लपवून फसवणूक करत लग्न लावून दिल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT