पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या 107 व्या भागाला संबोधित केले. या कार्यक्रमात त्यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजच्याच दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हल्ला झाला होता. 26/11 चा हल्ला देश कधीच विसरू शकत नाही. पण आपल्या देशाची ताकद अशी आहे की, आज आपण त्या हल्ल्यातून फक्त सावरलोच नाही तर, दहशतवादालाही चिरडत आहोत.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आजचा दिवस विशेष आहे कारण या दिवशी आपल्या देशाचे संविधान तयार करण्यात आले होते. त्यामुळे 2015 मध्ये देश डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी करत असताना 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपले संविधान बनवण्यासाठी 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले. ते म्हणाले की, सच्चियानंद जी या संविधान सभेचे सर्वात जुने सदस्य होते. 60 देशांचा अभ्यास करून आपली राज्यघटना तयार करण्यात आली आहे. संविधानाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्यात 2000 हून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आतापर्यंत आम्ही 106 दुरुस्त्या केल्या आहेत. (Latest Marathi News)
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा सर्वजण एकत्र असतात तेव्हाच सर्वांचा विकास होतो. आपल्या सरकारने संविधान निर्मात्यांच्या याच दृष्टीकोनातून भारताच्या संसदेने नारी शक्ती वंदन कायदा मंजूर केला. हा कायदा म्हणजे आपल्या लोकशाहीच्या ताकदीचे उदाहरण असल्याचे ते म्हणाले. जेव्हा लोक राष्ट्र उभारणीत भाग घेतात, तेव्हा त्यांना पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
'फक्त मेड इन इंडिया उत्पादने खरेदी करा'
पंतप्रधान म्हणाले की, 'आपल्याला ठरवायचे आहे की, देशात बनवलेल्या उत्पादनांचाच वापर करायचा आहे. यातून आणलेल्या जनजागृतीचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, आजची मुले जेव्हा वस्तू खरेदी करायला जातात तेव्हा त्यावर मेड इन इंडिया लिहिलेले आहे की, नाही ते तपासतात. ते पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियान लोकांचे अभियान बनले त्याचप्रमाणे व्होकल फॉर लोकल अभियान देशाला विकासाच्या मार्गावर नेत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.