Sniffer Dog
Sniffer DogSaam Tv

Chandrapur News : वन्यप्राण्यांच्या शिकारी रोखण्यासाठी आता 'सुपर स्निफर' डॉगची मदत, ११ श्वानांना देण्यात येणार प्रशिक्षण

Sniffer Dog : वन्यप्राण्यांच्या शिकारी रोखण्यासाठी आता 'सुपर स्निफर' डॉगची मदत, ११ श्वानांना देण्यात येणार प्रशिक्षण
Published on

>> संजय तुमराम

देशभरात शिकारींच्या घटना अनेक व्याघ्र प्रकल्प व इतर जंगलामध्ये नोंदल्या गेल्या आहेत. वाघच नव्हे तर इतरही प्राण्यांचा यात समावेश असतो. आता या संबंधातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 'सुपर स्निफर डॉग'ची मदत घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील पेंचसह देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये या श्वानांना तैनात केले जाणार आहे. ११ श्वान आणि त्यांना हाताळणाऱ्या २२ व्यक्तींना हरियाणा येथील पंचकुला येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. वन्यजीव गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी 'स्निफर' श्वानचे प्रशिक्षण आता एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sniffer Dog
Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोण किती जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक? फडणवीसांनी सांगितला आकडा...

पंचकुला येथील 'बेसिक ट्रेनिंग सेंटर-इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स' येथे ११ तरुण श्वान आणि त्यांना हाताळणाऱ्या २२ व्यक्तींच्या नवीन तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. 'डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया' आणि 'ट्रॅफिक'च्या या उपक्रमाअंतर्गत आता वन्यजीव क्षेत्रातील 'स्निफर' श्वानांची संख्या १०५ होईल. बेल्जियम मालिनॉईस जातीचे सहा ते नऊ महिन्यांचे तरुण श्वान आणि त्यांना हाताळणाऱ्या व्यक्ती सुमारे सात ते आठ महिने प्रशिक्षण घेतील.

या प्रशिक्षणात त्यांना वन्यजीव क्षेत्रातील गुन्हे शोधून त्यावर अंकुश ठेवण्याचे कौशल्य शिकवले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वन्यजीव 'स्निफर' श्वान पथके महाराष्ट्रासह उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगालच्या वन विभागात सामील होतील.  (Latest Marathi News)

Sniffer Dog
15 YRS Of 26/11 Mumbai Attack : फायरिंग आणि स्फोटांच्या आवाजाने हादरली होती मुंबई; ३ दिवस सुरु होता मृत्यूतांडव

'सुपर स्निफर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्रॅफिक आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाच्या कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षक वन्यजीव 'स्निफर' श्वान पथके तस्करांकडून प्रतिबंधित वन्यप्रजाती जप्त करण्यात आणि शिकाऱ्यांना पकडण्यात यशस्वी झाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com