A mango-laden truck overturned near Reddycheruvu, Andhra Pradesh, killing 9 and injuring 12. CM Chandrababu Naidu expressed grief. Driver blamed for negligence. 
देश विदेश

Road Accident : आंब्याचा ट्रक पिकअपवर उलटला, ९ जणांचा जागीच मृत्यू, १२ जखमी

Mango Truck Crash : आंध्र प्रदेशात आंब्याचा ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला. ९ मजूरांचा मृत्यू, १२ जण जखमी. चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.

Namdeo Kumbhar

Mango Truck Accident : आंब्याचा ट्रक उलटल्यामुळे भयंकर भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर १२ जण जखमी झाले आहे. आंध्र प्रदेशमधील अन्नामय्या जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखळ करण्यात आले, तर ९ मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून या दुर्घटनेबाबात दु:ख व्यक्त करण्यात आलेय.

आंध्र प्रदेशातील अन्नामय्या जिल्ह्यातील रेड्डीचेरुवुजवळ रविवारी रात्री आंब्याने भरलेला एक ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. ट्रक राजमपेट मंडलातील थल्लापका गावाहून कोडूरला जात होता. ट्रकवर आंब्याच्या पेट्यांवर मजूर बसले होते. रेड्डीपल्ली तलावाच्या बांधावर चढताना ट्रकचा मागचा चाक रेतीत अडकल्याने ट्रक पिकवरवर उलटला अन् अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांकडून अपघाताच्या कारणांची माहिती घेतली असून, जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी सूचना दिल्या आहेत.

पोलिसांची माहिती आणि तपास

अन्नामय्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व्ही. विद्यासागर नायडू यांनी सांगितले, ट्रक डाव्या बाजूला उलटल्याने. आतमध्ये आंब्याच्या पेटीवर बसलेले मजूर खाली पडले. त्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जखमी आहेत. अपघातामधील जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कडप्पा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुल्लमपेट पोलीस ठाण्यात बीएनएस आणि मोटर वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालकावर गंभीर आरोप -

या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांनी चालकावर निष्काळजीचा आरोप केला आहे. तक्रारदार एन. शिव कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, चालकाने वेगाने वाहन चालवल्याने त्याचा ताबा सुटला. यामुळे माझी पत्नी आणि इतर लोक वाहनाखाली अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बचेलेल्यांनीही चालकाच्या बेजबाबदार वर्तनामुळे हा अपघात घडल्याचा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT