Drunk Driving : दारूच्या नशेत मध्यरात्री ऑडी वाऱ्याच्या वेगाने पळवली, फुटपाथवरील ५ जणांचा चिरडले

Delhi Drunk Driving Incident: दिल्लीच्या वसंत विहारमध्ये दारूच्या नशेत असलेल्या ऑडी चालकाने पाच पादचाऱ्यांना चिरडले. चालक उत्सव शेखरला अटक झाली असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
DelhiAccident
Scene from Delhi’s Vasant Vihar, where a speeding Audi driven by a drunk man crushed five footpath dwellers.AI Image
Published On

Audi driver in Delhi drunk during the crash : राजधानी दिल्लीमध्ये एक भयंकर अपघाताची घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने भरधाव वेगाने ऑडी कार चालवली. त्याने फुटपाथवरील पाच जणांना चिरडले. ९ जुलै रोजी रात्री दिल्लीच्या वसंत विहार भागात ही घटना घडली. चालकाचे नाव उत्सव शेखर असे आहे. चालकाला आणि गाडीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालकाची मेडिकल चाचणी केली असता दो दारू प्यायल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

नवी दिल्लीच्या वसंत विहार भागात झालेल्या या अपघातात दोन जोडपी आणि एक 8 वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. पोलिसांनी चालक उत्सव शेखर याला ताब्यात घेतले आहे. तो नशेत असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळले. जखमीमध्ये लाधी (40), त्याची मुलगी बिमला (8), सबामी उर्फ चिरमा (45), राम चंद्र (45) आणि त्याची पत्नी नारायणी (35) यांचा समावेश आहे. हे सर्व मूळचे राजस्थानचे रहिवासी असून दिल्लीत मजुरी करतात.

DelhiAccident
Air India Plane Crash: 'टेकऑफनंतर ३ सेकंदात दोन्ही इंजिन बंद', २७५ जणांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

वसंत विहारमधील स्थानिकांनी सांगितले की, रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांवर एक पांढरी ऑडी कार वेगाने आली आणि त्यांना चिरडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केला. घटनास्थळावरून चालक आणि गाडीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चालक उत्सव शेखर याच्याविरुद्ध बेदरकारपणे गाडी चालवणे आणि गंभीर जखम करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिकांच्या मते, चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी त्याला पकडले.

DelhiAccident
एसटी महामंडळाला विठुराया पावला! पंढरपूर वारीतून तब्बल इतक्या कोटींचे उत्पन्न, सरनाईकांची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com