UP Crime News: उत्तर प्रदेशमध्ये बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमाला फासणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमधील ही घटना घडली आहे. या प्रकरणी शाहगंज पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, बापाकडून अल्पवयीन मुलीवर गेल्या ८ महिन्यापासून घृणास्पद कृत्य करत होता. मद्याच्या आहारी गेलेल्या बापाने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. पीडितेने पोलिसांसमोर सर्व प्रकरण सांगितल्यावर बापाचं कृत्य समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी (Police) पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करत बापाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बाप हा १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर झाल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या देत होता. या मुलीने काही दिवसांपूर्वीच मृत बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर बापाने अर्भकाला रात्रीच्या अंधारात फेकून दिलं होतं. त्यानंतर तिच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.
अल्पवयीन मुलगी बापाच्या जाचाला कंटाळून पोलिसात धाव घेतली. त्यानंतर सदर प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी बापाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीवर कलम ३७६, ३१३, ३१८, ५०४ कलमांतर्गत आणि पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आरोपीने चौकशीत मद्याच्या नशेत घृणास्पद कृत्य केल्याचं मान्य केलं. आरोपी सध्या अटकेत असून त्याची चौकशी सुरु आहे.
आरोपी बाप गेल्या ८ महिन्यापासून मुलीवर अत्याचार करत होता. त्यानंतर पीडिता गरोदर झाली. त्यानंतर आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यावेळी पीडित मुलीने ८ महिन्याच्या मृत अर्भकाला जन्म दिला. मात्र, आरोपीने या अर्भकाला रात्रीच्या अंधारात फेकून दिलं. त्यानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल केले.
पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आरोपीकडून पीडित मुलीला त्रास सुरू होता. आरोपीच्या जाचाला कंटाळून पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठलं. त्यानंतर बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारं प्रकरण उघडकीस आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.