Mumbai Crime News: वृद्ध महिलेचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना अटक, एम एच बी कॉलनी पोलिसांची कारवाई; फिल्मी स्टाईल पाठलाग...

Mumbai News Update: जबरी चोरी करून पळून जाणाऱ्या 2 आरोपींना एम एच बी कॉलनी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले.
Mumbai Crime
Mumbai CrimeSaamtv
Published On

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai Crime: मागील काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) चेन स्नॅचिंग आणि मोबाईल हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काल गुरुवारी एका वृद्ध महिलेला जोराचा धक्का देऊन जखमी करून मोबाईल फोन जबरीने चोरी करून पळून जाणाऱ्या 2 आरोपींना एम एच बी कॉलनी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. व दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रितिक राकेश पटेल (19 वर्ष) आणि प्रेम खुशाल सोलंकी (19 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. (Latest Marathi News)

Mumbai Crime
Sushma Andhare News: 'गावात रस्ते नाहीत पण, शेतात हेलिपॅड..' सुषमा अंधारेंची CM शिंदेंवर खोचक टीका; बारसू रिफायनरी आंदोलनावरुन सरकारवर हल्लाबोल

मिळालेल्या माहितीनुसार, कांदर पाडा दहिसर पश्चिम परिसरात राहणारी 63 वर्षीय महिला मिनती अबंरीश नंदा ही बँक ऑफ बडोद्याचे समोरून रस्त्याने जात असताना दोन तरुणांनी त्यांना जोरदार धक्का देऊन खाली पाडले व जखमी केले. तसेच तिचा मोबाईल घेऊन पळून गेले यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सतरा अठरा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून आरोपीची ओळख पटवली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपी रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे समजतात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पो.उ.नि. अखिलेश बोंबे, प्रवीण जोपले,संदीप परीट, सतीश देवकर, गणेश शेरमाळे ही तपास टीम आरोपींच्या ठिकाणावर गेली.

Mumbai Crime
Nitesh Rane यांना लाेक पळवून लावतील, हिंमत असेल तर बारसूत जा; वैभव नाईकांचे आव्हान

मात्र पोलिसांना पाहताच आरोपींनी रेल्वेपटरी वरून पळ काढला. यावेळी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून 1 आयफोनही ताब्यात घेतला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 392,34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपींनी यापूर्वी कुठे अशा प्रकारे चोऱ्या केल्या आहेत का किंवा त्यांनी इतर कोणते गुन्हे केले आहेत का याविषयीचा तपास एम एच बी कॉलनी पोलीस करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com