Karnataka News: कर्नाटकमध्ये (Karnataka) मित्रानेच मित्राचा घात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने जंगलामध्ये नेऊन आधी मित्राचा गळा चिरला त्यानंतर त्याचे रक्त प्यायले. आरोपी ऐवढ्यावर न थांबता त्याने मित्राला मारहाण देखील केली. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या त्यांच्याच मित्राने ही घटना मोबाईलमध्ये (Mobile) कैद केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चार दिवसांपूर्वी कर्नाटकातील चिक्कबल्लापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या चिंतामणी तालुका बाटलाहल्ली येथे ही घटना घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या विजयने चार दिवसांपूर्वी चेलूर तालुक्यातील माडेमपल्ली येथे राहणारा आपला मित्र मारेश याच्यावर प्राणघातक हल्ला केला. विजय 19 जून रोजी आपला मित्र जॉनसोबत मारेशला घेऊन जंगलामध्ये गेला होता. जंगलामध्ये गेल्यानंतर विजय आणि मारेश यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर संतप्त झालेल्या विजयने सोबत आणलेल्या चाकूने मारेशचा गळा चिरला. त्यानंतर विजयने मारेशच्या गळ्यातून निघणारे रक्त पिण्याचा प्रयत्न केला.
आरोपी विजय ऐवढ्यावर थांबला नाही तर त्याने मारेशला मारहाण देखील केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मारेशने मदतीसाठी आरडाओरड केला पण विजय काही थांबला नाही. या घटनेचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या जॉनने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी विजयला अटक केली. पत्नीचे मारेशसोबत अनैतिकसंबंध असल्याचा विजयला संशय होता. त्यामुळेच त्याने आपल्या मित्रासोबत हे भयानक कृत्य केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मारेशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारेशने दिलेल्या तक्रारीनंतरच पोलिसांनी विजयला अटक केली. ही घटना घडली त्यावेळी विजयची पत्नी घटनास्थळावर उपस्थित होती. संतप्त झालेल्या विजयने मारेशवर हल्ला केल्यानंतर त्याच्या पत्नीवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तिने घटनास्थळावरुन पळ काढल्यामुळे सुदैवाने ती बचावली आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.