Ajay Devgn: रम्मीच्या जाहिरातीवरून नांदेडच्या तरुणाचे अजय देवगनला थेट पत्र; म्हणाला, 'बेरोजगारीमुळं तरुणांच्या...

Nanded Youth Letter To Ajay Devgn: या पत्राच्या माध्यमातून या तरुणाने अजय देवगणला अनेक सवाल विचारले आहेत.
Ajay devgn
Ajay DevgnYandex
Published On

Superstar Ajay Devgn: रम्मी या गेमने (Rummy Fantasy Game) तरुणांना चांगलंच वेड लावले आहे. सोशल मीडियावर या गेमच्या सतत जाहिराती येत असून तरुणांना त्याकडे आकर्षित केले जात आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी देखील या गेमची जाहिरात करताना दिसत आहेत. ही गेम खेळून काहींनी पैसे कमावले तर काही कर्जबाजारी झाले आहेत. अशामध्ये या गेमची जाहिरात करणाऱ्या सुपरस्टार अजय देवगणलाच नांदेडच्या एका तरुणाने पत्र पाठवले आहे. या पत्राच्या माध्यमातून या तरुणाने अजय देवगणला अनेक सवाल विचारले आहेत.

Ajay devgn
Mumbai Heavy Rain : घाटकोपरमध्ये घर कोसळून ४ जखमी; ठाण्यात ३५ फुटांची भिंत चाळीवर कोसळली

नांदेडमध्ये राहणाऱ्या विलास प्रतापराव शिंदे या तरुणाने अजय देवगणला पत्र पाठवत रम्मी गेमवरुन त्याला धारेवर धरले आहे. या तरुणाने अजय देवगणला त्याच्या जुहू येथील शीतल अपार्टमेंट या घराच्या पत्त्यावर पत्र पाठवले आहे. ऐवढंच नाही तर या तरुणाने अजय देवगणला अनेक सवाल देखील विचारले आहेत. रम्मी खेळून तुम्ही किती पैसे जिंकले?, असा प्रश्न त्याने विचारला आहे. सध्या या तरुणाचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरले आहे.

Ajay devgn
Delhi Crime News: भररस्त्यात डिलिव्हरी एजंटसोबत लुटमार; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

विलास शिंदेने या पत्रात असे लिहिले आहे की, 'आपण ज्या रम्मी ऑनलाईन गेमची जाहिरात करता. रम्मी ही ऑनलाईन गेम खेळून तुम्ही आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहेत? या जाहीरातीचा उद्देश काय आहे? हे महाराष्ट्रातील नवतरुण व कर्जबाजारी तरुणांना आपल्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे.

'अभिनेता अजय देवगन तुम्हाला सप्रेम नमस्कार व राम राम. आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरुण आहेत. हे तुमच्यासाठी अभिमानाची व तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा खूप सारे नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्यांने सोशल मीडियावर केले पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहीरात पाहून अनेक नवतरुणांना या गेम खेळण्याची जनु सवयच लागली? व याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत?"

Ajay devgn
Sharad Pawar On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील; शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

'त्यामुळे अनेक तरूणांना प्रश्न पडला आहे की आपण रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे? व जाहीरातीचा उद्देश काय आहे? हे महाराष्ट्रातील तरुणांना तुम्ही सांगितले पाहिजे. हे नवतरूणांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व आपण सांगितले पाहिजे. जर ह्याच गेमला काही राज्यात बंदी आहे. आपण मात्र बिनधास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरुणांना हा रम्मी गेम किती फायद्याचा आहे. हे पण आपण सांगितले पाहिजे.'

तसंच, 'हाच गेम तुमच्या आजुबाजूचे किती मान्यवर खेळतात हे पण आपण पाहीले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरूणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशा जाहीराती करून नवतरूणांना काय संदेश देत आहोत हे पण सांगितले पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे? या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा आणि आपण ही जाहीरात बंद करावी व नवतरुणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.', असे या तरुणने पत्रात लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com