Sharad Pawar On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील; शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

Political News : शरद पवारांना उद्देशून बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी 1977 च्या सरकार स्थापनेचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता.
Sharad Pawar on Devendra Fadnavis
Sharad Pawar on Devendra FadnavisSaam TV
Published On

Baramati News : एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी आणि शरद पवार यांनी केलं तर मुत्सद्देगिरी असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी कधी असं केलं त्यांनी सांगावं, असं शरद पवार यांनी म्हटलं.

1977 साली आम्ही सरकार बनवलं, पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी ते (फडणवीस) लहान मुलं असतील. त्यामुळे त्यांना कदाचित ते कळलं नसेल. त्यांना पूर्वीचा इतिहास माहित नसेल.  (Maharashtra Politics)

मी जे सरकार बनवलं तेव्हा सर्वांना घेऊन बनवलं होते. कदाचित ते त्यावेळी प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे अज्ञानापोटी ते असं वक्तव्य करत असतील, यापेक्षा जास्त यावर भाष्य्य करण्याची गरज नाही, असा खोचक टोला शरद पवारांना फडणवीसांना लगावला आहे.

Sharad Pawar on Devendra Fadnavis
Shrikant Shinde News : कोरोना बॉडीबॅग ठाण्यात ३५० रुपयांना मिळत असताना मुंबईत ६७०० रुपयांना, खासदार श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

काय म्हणाले होते फडणवीस?

शरद पवारांना उद्देशून बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी 1977 च्या सरकार स्थापनेचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते.

Sharad Pawar on Devendra Fadnavis
Sharad Pawar News : अजित पवारांची राष्ट्रवादी प्रदेशाध्यपदी काम करण्याची इच्छा पूर्ण होणार? शरद पवार म्हणाले...

त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com