Delhi News: दिल्लीत सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता देखील दिल्लीमध्ये लुटमारीची एक मोठी घटना घडली आहे. या घटनेत भररस्त्यात एका व्यक्तीकडून २ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आलीये. (Latest Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी प्रगती मैदान बोगद्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. यात एक डिलिव्हरी एजंट आणि त्याच्या सहकाऱ्याकडून १.५ ते २ लाख रुपयांची रोकड अज्ञात हल्लेखोरांनी लुटलीये. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी देखील सोशल मीडियावर लुटमारीचा हा व्हिडिओ पोस्ट केलाय. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे.
ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे की, "दिल्लीतील लोकांना सुरक्षितता आणि सुरक्षा देऊ शकेल अशा व्यक्तीसाठी वेगळा मार्ग तयार करा. केंद्र सरकार दिल्ली (Delhi) सुरक्षित करू शकत नसेल तर ती जबाबदारी आमच्याकडे सोपवा. शहर नागरिकांसाठी सुरक्षित कसे बनवायचे ते आम्ही तुम्हाला दाखवू."
दरम्यान, लुटमार करतानाचा व्हिडिओ (Video) समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. भर रस्त्यात वाहतूक सुरु असताना ४ जणांच्या टोळक्याने लुटमार केली आहे. घटना घडली तेव्हा रस्त्यावर अन्य प्रवाशी देखील होते. मात्र आपला जीव वाचवत त्यांनी तेथून निघून जाण्याची भूमीका घेतली आहे. या घटमुळे दिल्लीकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.