Beed Crime News : धक्कादायक! लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांचाच पीडितेवर दबाव, जबरदस्ती घ्यायला लावलं भावजीचं नाव

Police Pressured Victim: या प्रकरणातील पीडितेने स्वत: उच्च न्यायालयात पोलिसांनी भावजीचं नाव घेण्यासाठी दबाव टाकला असे शपथपत्र सादर केले आहे.
Beed crime
Beed crimeSAAM TV
Published On

Beed News : बीडमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेवर पोलिसांनी दबाव टाकून जबरदस्तीने भावजीचं नाव घेण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील पीडितेने स्वत: उच्च न्यायालयात पोलिसांनी भावजीचं नाव घेण्यासाठी दबाव टाकला असे शपथपत्र सादर केले आहे. बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यांतर्गत हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पाटोदा पोलिसात ऑक्टोबरमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला होता. तेव्हा पीडितेने कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र, त्यानंतर पाटोदा पोलिसांनी पीडितेच्या पुरवणी जबाबाआधारे पीडितेच्या बहिणीच्या पतीला यात आरोपी केले.

Beed crime
Chhagan Bhujbal News: ओबीसींना आपले हक्क मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक... राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे विधान

यानंतर आरोपीने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. याची सुनावणी खंडपीठात न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांच्यासमोर झाली. खंडपीठातील सुनावणीदरम्यान पीडितेने पोलिसांनी आपल्यावर याप्रकरणात आरोपीचे नाव घ्यायला दबाव टाकल्याचे धक्कादायक जबाब दिला. (Marathi Tajya Batmya)

पीडितेने न्यायालयात शपथपत्राद्वारे सांगितले की, पोलिसांनी तिच्यावर मावस भावाचे किंवा भावजीचे नाव घेण्यासाठी दबाव आणला आणि पोलीस ठाण्यात जिथे सीसीटीव्ही नाहीत तेथे नेऊन मारहाण केली. तसेच स्वतः न्यायालयात उपस्थित राहून देखील पीडितेने ही माहिती दिली. (Latest Political News)

Beed crime
Thane - Borivali Tunnel: खुशखबर! आता ठाणे ते बोरिवली फक्त 10 मिनिटात गाठता येणार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर केला असून तपासी अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी बीडच्या पोलीस अधीक्षकांनी महिनाभराच्या आत सुरू करावी आणि तीन महिन्यांत पूर्ण करून चौकशी अहवाल सादर करावा असे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com