Mamta Kulkarni sparks outrage by claiming Dawood Ibrahim is “not a terrorist.” saam tv marathi
देश विदेश

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट केला नाही, तो दहशतवादी नाही, ममता कुलकर्णीचा धक्कादायक दावा

Mamta Kulkarni on Dawood Ibrahim : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने दाऊद इब्राहिम दहशतवादी नसल्याचा दावा करत मोठा वाद निर्माण केला आहे. “दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट केले नाहीत,” असा दावा तिने केला. 1993 च्या मुंबई स्फोटांवर तपास यंत्रणांनी दिलेल्या निष्कर्षांना आव्हान देणारे हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

Namdeo Kumbhar

Mamta Kulkarni on Dawood Ibrahim controversy explanation : बॉलिवूड अभिनेत्री ते साध्वी असा प्रवास करणारी ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आहे. दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्ब स्फोट केलाच नाही, असा खळबळजनक दावा ममता कुलकर्णीने केला आहे. इतकेच नाही तर दाऊद इम्बाहिम हा काही दहशतवादी नाही, असेही धक्कादायक वक्तव्य ममताने केलेय. अभिनेत्रीच्या या वक्तव्याने देशभरात खळबळ उडाली आहे. (Bollywood actress defending Dawood Ibrahim latest news)

उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये बोलताना ममताने दाऊद इब्राहिमचा बचाव केला. ममता कुलकर्णीने दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देत तो काही आतंकवादी नाही, असे म्हटले. ममता कुलकर्णीने दाऊदबद्दल केलेले हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांनी ममता कुलकर्णीच्या दाव्यावर नाराजी व्यक्त करत आपला संपात दाखवला आहे. १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता. सीबीआय, एनआएच्या रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील या बॉम्बस्फोटामागे दाऊद इब्राहिमचाच हात होता.

भारतामधील तपास यंत्रणानी दाऊद हा ISI च्या जवळ असल्याचे अनेकदा सांगितलेय. १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या विध्वंसक स्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमच होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे. पण हाच दाऊद दहशतवादी नसल्याचे सांगत ममताने नवा वाद निर्माण केलाय. ममता कुलकर्णीचे हे विधान भारतीय न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यांना थेट आव्हान देतेय.

दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही -

गोरखपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना ममता कुलकर्णीने दाऊद इब्राहिमबाबत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान केले. ती म्हणाली की, दाऊद इब्राहिम दहशतवादी नव्हता. त्याने कधीही मुंबईत बॉम्बस्फोट घडवले नाहीत. माझा आणि दाऊदचा कोणताही संबंध नाही, आम्ही कधीही भेटलो नाही. दरम्यान, ९० च्या दशकात दाऊद आणि ममता कुलकर्णी यांचे नाव जोडले गेले होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवडूसह राज्यात अन् देशात होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli : गोळीबाराचा वाद विरला? भाजप आमदार आणि महेश गायकवाड एकत्र, कल्याणसाठी शिंदे-भाजपचा फॉर्म्युला ठरला?

Skin Care: दुकानात मिळणारे अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावणे होतील 'हे' नुकसान; आजपासूनच घ्या काळजी

CBSE दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीची परीक्षा दोनदा होणार

Maharashtra Live News Update: कोरेगाव भीमामध्ये बसला आग, प्रवाशांंची धावाधाव

Accident News: भयंकर अपघात! दुचाकी समोरासमोर धडकल्या, पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT