ममता बॅर्नजी घेणार नितीन गडकरींची भेट; राजकीय चर्चांना उधान Saam Tv
देश विदेश

ममता बॅर्नजी घेणार नितीन गडकरींची भेट; राजकीय चर्चांना उधान

मोदी सरकार (Modi Government) विरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banerji) दिल्लीतील विरोधी पक्षाच्या भेटी गाठी घेत आहेत.

विहंग ठाकूर

नवी दिल्ली: मोदी सरकार (Modi Government) विरोधात विरोधकांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banerji) दिल्लीतील विरोधी पक्षाच्या भेटी गाठी घेत आहेत. पण भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी २ वाजता नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवास्थानी या दोन्ही नेत्यांची भेट होईल. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर गडकरी हे दुसरे भाजप नेते आहेत ज्यांना ममता बॅनर्जी आज भेटणार आहेत. याशिवाय डीएमके नेत्या कनिमोई यांची सांयकाळी ४ वाजता ममता भेट घेणार आहेत.

दरम्यान, मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली होती. बुधवारी, त्या कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी 10 जनपथ येथे पोहोचल्या. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित होते.

सोनिया यांना भेटल्यानंतर ममतांनी सांगितले की कॉंग्रेस अध्यक्षांनी मला चहासाठी बोलावले होते, राहुल जी तिथे होते. आम्ही राजकीय परिस्थिती, पेगासस आणि कोरोनामधील परिस्थिती आणि विरोधी पक्षाच्या ऐक्याबद्दल चर्चा केली. खूप छान भेट झाली. मला वाटते की हे भविष्यात सकारात्मक परिणाम आणेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची चौकशी, VSIचं ऑडिट की अजितदादा टार्गेट?

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ बस आणि कारचा अपघात

Bihar Elections : लाडक्या बहि‍णींना २५०० रुपये, मोफत वीज, सरकारी नोकरी; इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

उपराज्यपालांच्या नातवाची आत्महत्या; कानपूरमध्ये सापडला मृतदेह,चिठ्ठीतून उलगडणार सत्य

Chhagan Bhujbal : मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT