mamata banerjee Saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

mamata banerjee : ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसलाय. माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीने पदाचा राजीनामा खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का

ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

महिला नेत्याच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या अडचणी दिवसेंदिवस अडचणी वाढताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या बारासात संघटना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आलं आहे.

काकोली घोष दस्तीदार या चार वेळा तृ्णमूल काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी अचानक पक्षातील पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने जिल्हा पातळीवर खराब कामगिरी केली. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना अधिक महत्व देण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

काकोली घोष दस्तीदार यांना लोकसभेच्या मुख्य दक्षता अधिकारी पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट नाराजी व्यक्त केली होती. 'आज मला चार दशकांच्या प्रामाणिकपणाचे फळ मिळालंय, अशी त्यांनी पोस्ट केली होती. दुसरीकडे काकोली यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर २४ परगणा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनाम्याची घोषणा केली.

काकोली यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना तृणमूलचे आमदार कुणाल घोष यांनी म्हटलं की, ही पक्षातील अंतर्गत प्रकरण आहे. त्यांनी राजीनामा दिला की नाही, यावर कोणतीही प्रतिक्रिया आता देणार नाही. जेव्हा पक्ष सांगेल, तेव्हा प्रतिक्रिया देईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: तुमच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी; वेळीच घ्या स्वतःची काळजी

Maharashtra Weather Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो कोसळणार पाऊस, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra News Live Update: परभणीत 7 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा

पावसाळी पर्यटनाचा प्लॅन करताय? तर मग थांबा; 'या' प्रसिद्ध ४ ठिकाणांवर प्रशासनाचे कडक निर्बंध

Politics : उद्धव ठाकरेंना जबरा धक्का; शिंदेसेनेत जाताच महिला नेत्यावर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT