Bus Accident
Bus Accident Yandex
देश विदेश

Mali Bus Accident: मालीमध्ये भीषण अपघात, बस पुलावरुन थेट नदीत कोसळली, ३१ प्रवाशांचा मृत्यू

Rohini Gudaghe

Mali Road Accident News

आफ्रिकन देश मालीमध्ये एक बस पुलावरून खाली पडली. या अपघातात ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी झाल्याची माहिती आहे. नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना केनिबा परिसरात (Mali Accident) घडली. (Latest Accident News)

या घटनेबाबत परिवहन मंत्रालयाने सांगितले की, २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात मालीमध्ये ३१ जणांचा मृत्यू (Mali Accident Death) झाला आणि १० जण जखमी झाले. बुर्किना फासोच्या दिशेने जाणारी बस देशाच्या दक्षिण-पूर्व भागात असलेल्या पुलावरून खाली नदीत पडल्याने (Mali bus plunges) हा अपघात झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं

मालीमध्ये (Mali Africa) दररोज रस्ते अपघात होतात. मंत्रालयाने अपघाताबाबत पुढे सांगितले की, बागो नदी ओलांडणाऱ्या पुलावर हा अपघात २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता झाला. या अपघातात ३१ जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर १० जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात अतिशय भीषण होता, असं सांगितलं जात आहे.

मंत्रालयाने सांगितले की, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं (Mali accident victims) होतं, हे अपघातामागील कारण होतं. माळी येथे वारंवार रस्ते अपघात होत असतात. देशातील अनेक रस्ते, महामार्ग आणि वाहनांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. आफ्रिकन देश मालीमध्ये वारंवार अपघात होत असल्याचं समोर येत आहे.

बस आणि ट्रक यांच्यात टक्कर

आफ्रिकन देश मालीमध्ये या अगोदर देखील भीषण अपघात झाला होता. या घटनेत १५ जणांनी त्यांचा जीव गमावल्याचं वृत्त आहे. वाहनांच्या भरधाव वेगामुळे अलीकडे रस्ते अपघाताच्या (Road Accident) घटना वाढल्या आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला, मध्य माली येथे राजधानी बामाकोच्या दिशेने जाणारी बस एका ट्रकला धडकली (Mali Bus Accident) होती. तेव्हा या अपघातात 15 लोक ठार आणि 46 जखमी झाले होती. दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने जात होती. जगभरातील रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू आफ्रिकेत होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video: शिवाजी पार्कवर मोदींचं स्वागत होत असताना राज ठाकरेंची बॉडिलॅग्वेज कशी होती?

Nagpur Crime : जुन्या वादातून युवा कॅबचालकाचा खून, दाेघांवर गुन्हा दाखल

Pani Puri: घरच्या घरी बनवा टम्म फुगलेली पाणीपुरी, सोपी रेसीपी

Actor Chandrakanth Dies : जवळच्या मैत्रिणीचा कार अपघातात मृत्यू, नैराश्यात बुडालेल्या अभिनेत्याने संपवलं जीवन

Raj Thackeray यांचा हात धरला, त्यांना पुढे आणलं! Devendra Fadnavis यांची कृती चर्चेत, Video पाहिलात?

SCROLL FOR NEXT