Maldives  Saam tv
देश विदेश

Maldives : बहिष्कारामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला फटका; आता भारतीयांना पर्यटनासाठी आकर्षित करण्यासाठी भारतात करणार रोड शो

Maldives latest News in marathi : भारताशी संबंध बिघडल्यानंतर मालदीवला चांगलंच महागात पडलं आहे. मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे.

Vishal Gangurde

Maldives latest Update:

भारताशी संबंध बिघडल्यानंतर मालदीवला चांगलंच महागात पडलं आहे. मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे आता आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मालदीवने भारतात पर्यटकांना आकर्षित मोठ्या शहरात रोड शो करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालदीवच्या चारी बाजूला समुद्र असल्याने मालदीवचा अर्थव्यवस्थेचा प्रमुख स्त्रोत हा पर्यटन हा आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक मालदीवमध्ये जात होते. मात्र, राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी त्यांच्या येथील निवडणुकीत 'इंडिया आऊट'चा नारा दिला होता. यानंतर भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले होते.

काही आठवड्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या लक्षद्वीपला भेट दिली होती. या भेटीदरम्यानचे फोटोही समोर आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर लक्षद्वीप आणि मालदीवची तुलना सुरु झाली. यानंतर मालदीवच्या काही मंत्री आणि अधिकाऱ्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे मालदीवला मोठा आर्थिक फटला बसला होता. त्यानंतर आता पर्यटनातून आर्थिक फायदा होण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

८ एप्रिलला मालेमध्ये भारतीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर 'मालदीव असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजेंट्स अँड टूर ऑपरेटर्स' (MATATO) भारतात रोड शोर करण्याचा निर्णय घेतला आहे. मालदीवमध्ये पर्यटकांनी भेट देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

मालदीवच्या पर्यटन एजेन्सीने एक निवेदन देखील जारी केलं आहे. 'MATATO' ने पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून भारतातील शहरात रोड शो करण्याचं ठरवलं आहे. यासाठी पुढील काही महिन्यात सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला मालदीवला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast: दिल्लीत शक्तीशाली स्फोट, आगीचे लोळ, धुराचे लोट; रस्त्यावर रक्ताचा सडा, हादरवून टाकणारे PHOTO

Puffed Chapati Tricks: चपाती तव्यावर नीट शेकत नाही? लगेचच वातड होते? मग ही भन्नाट टिप ठरेल बेस्ट

Bomb Blast in Delhi: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरांना अलर्ट

Breast Shape Change: लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT