Breaking News: येस बँक ४०० कोटी फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट; ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक

Yes Bank Fraud Case: येस बँक ४०० कोटी फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी अजित मेनन याला अटक केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून गुन्हे शाखेचे पथक आरोपी मेनन याच्या शोधात होते.
Yes Bank Latest News
Yes Bank Latest NewsSaam Tv

Yes Bank 400 Crore Fraud Case

येस बँक ४०० कोटी फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी अजित मेनन याला अटक केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून गुन्हे शाखेचे पथक आरोपी मेनन याच्या शोधात होते. आरोपी ब्रिटनमध्ये राहत असल्याने त्याला अटक करता येत नव्हती. मेननला दिसताक्षणी अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेने देशातील सर्व विमानतळ पोलिसांना दिल्या होत्या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yes Bank Latest News
Twitter Down : ट्विटर जगभरात ठप्प, Welcome to X! मेसेजमुळे युजर्स हैराण

गुरुवारी (ता. ११) आरोपी हा केरळमध्ये आला असता, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. आरोपी कॉक्स ॲण्ड कंपनीचे प्रवर्तक पीटर केरकर यांचा सहकारी होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये येस बँकेची सुमारे ४०० कोटींची फसवणूक झाल्याचं समोर आलं होतं. (Latest Marathi News)

याप्रकरणी बँकेचे मुख्य दक्षता अधिकारी आशिष विनोद जोशी यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने कॉक्स अँड किंग्ज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कॉक्स आणि किंग्सची कंपनीच्या उपकंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता.त्यावेळी अजित मेनन हा कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होता.

तक्रारीनुसार, कॉक्स अँड किंग्ज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीतर्फे पर्यटनासाठी, तसेच शिक्षणासाठी कर्ज आणि नॉन बँकिंग कर्ज उपलब्ध करण्यात येत होते. २०१८ ते २०१९ या वर्षात आरोपींनी कंपनीच्या हिशोब वह्यांमध्ये बनावट नोंदी केल्या. त्यातून कंपनीची स्थिती चांगली असल्याचे दाखवले होते.

दरम्यान, कंपनीने २०१९ मध्ये येस बँकेकडून तब्बल ४०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. यापैकी ३४७ कोटी ४० लाख रुपये आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी कॉक्स अँड किंग्ज लिमिटेडकडे वळवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत केरकर आणि कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना यापूर्वीच अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेने अजित मेनन याला देखील केरळमधून अटक केली आहे.

Yes Bank Latest News
RBI:आरबीआयची मोठी कारवाई! शिरपूर मर्चंट बँकेच्या व्यवहारांवर ६ महिने बंदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com