Malaysia Helicopter Crash Saam Tv
देश विदेश

Malaysia Helicopter Crash : पतंगासारखे हेलकावे खाल्ले अन् हेलिकॉप्टर थेट नदीत कोसळले; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

malaysia Helicopter Crash : जोहोर, मलेशिया येथे पोलिसांचे AS355 हेलिकॉप्टर नदीत कोसळले. पाच अधिकारी सुखरूप वाचले असले तरी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची चौकशी नागरी उड्डयन प्राधिकरणांतर्गत हवाई अपघात तपास ब्युरोकडून सुरू आहे.

Alisha Khedekar

मलेशियातील जोहोर येथे गुरुवारी भीषण अपघात घडला. एक पोलिस हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंग दरम्यान थेट नदीत कोसळले. हे हेलिकॉप्टर नेहमीप्रमाणे लष्करी सराव करत होते. याच दरम्यान त्याचा अपघात झाला. महत्त्वाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून हेलिकॉप्टर मधील जवान वाचले आहेत. मलेशियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने म्हटले आहे की हवाई अपघात तपास ब्युरो या अपघाताची चौकशी करत आहे.

गेलांग पटह येथील मलेशियन मेरीटाईम एन्फोर्समेंट एजन्सी (MMEA) जेट्टीजवळ पोलिसांच्या मालकीच्या AS355 हेलिकॉप्टरचा गुरुवारी सकाळी अपघात झाला. मलेशियाच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने AS355N हेलिकॉप्टर सकाळी ९ : ५१ वाजता तनजुंग कुपांग पोलिस स्टेशन येथून पायलटसह पाच अधिकाऱ्यांसह निघाले होते असल्याचे सांगितले . आपत्कालीन लँडिंग दरम्यान ते थेट नदीत कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमानातील पाचही अधिकारी वाचले असले तरी, त्यातील पाचपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना श्वसन सहाय्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार , इतर तीन अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर जोहोर बारू येथील सुल्तान अमिनाह रुग्णालयात (HSA) उपचार सुरू आहेत.

पोलीस महानिरीक्षक काय म्हणाले?

हे हेलिकॉप्टर जुने असल्याचे दावे करण्यात आले आहेत. तथापि, पोलिस महानिरीक्षक दातुक सेरी मोहम्मद खालिद इस्माईल म्हणाले की, "वय ही समस्या नाही; योग्य देखभाल ही महत्त्वाची आहे. जे घडले ते आमच्या नियंत्रणाबाहेर आहे." "नागरी विमान वाहतूक नियम २०१६ च्या भाग XXVI नुसार, मलेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा हवाई अपघात तपास ब्युरो पुढील तपास करेल," असे CAAM ने म्हटले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

SCROLL FOR NEXT