मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाच्या लँडिंगदरम्यान धक्कादायक प्रकार घडला
कॉकपिटच्या दिशेने लेझर लाइट टाकण्यात आल्याने पायलटचे लक्ष विचलित झाले
विमानात १५९ प्रवासी होते ते सर्वजण घाबरले
लँडिंगपूर्वी विमानाला आकाशात घिरट्या घालाव्या लागल्या
क्वालालंपूरहून १५९ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या मलेशिया एअरलाइन्सच्या MH-184 या विमान अपघात होता होता वाचले. शनिवारी रात्री कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगदरम्यान भयंकर घडलं. पायलटच्या डोळ्यावर लेझर लाइट पडल्यामुळे त्याचे लक्ष विचलित झाले आणि हे विमान विमानतळ परिसरातच घिरट्या घेत राहिले. विमानतळ सूत्रांनुसार, कॉकपिटच्या दिशेने रोखलेल्या लेझर लाइटमुळे पायलटचे लक्ष विचलित झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११:२० वाजता हे विमान लँडिंग करणार होते. हे विमान विमानतळाच्या धावपट्टीपासून सुमारे आठ नॉटिकल मैल अंतरावर असताना पायलटच्या लक्षात आले की, मध्यमग्राम-बारासात दिशेकडून कॉकपिटच्या दिशेने लेझर लाइट येत आहे. लेझरच्या अचानक आलेल्या प्रखर प्रकाशामुळे पायलटचे लक्ष क्षणभर विचलित झाले.
लेझर लाइटमुळे लक्ष विचलतील होऊन पायलटला दिशा कळेनाशी झाली. यामुळे पायलटला विमानाचे लँडिंग नियोजित वेळेत करता आले नाही. पायलटने दुसऱ्यांदा विमानाचे लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याला आकाशामध्ये अनेक घिरट्या घाव्या लागल्या. शेवटी रात्री सुमारे ११:२५ वाजता विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग करण्यात पायलटला यश आले. पायलटच्या प्रयत्नाने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर एअरलाइनने विमानतळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता विमानतळ प्रशासनाने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. कोलकाता विमानतळाचे संचालक विक्रम सिंह यांनी सांगितले की, विमानतळ परिसरात लेझर लाइटच्या वापरास बंदी आहे.
अशा घटना अधूनमधून घडत असतात आणि त्याचा परिणाम विमान वाहतुकीवर होऊ शकतो. या प्रकरणाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली असून ते तपास करत आहेत. लेझर लाइटमुळे टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी विमानाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.