उत्तर प्रदेशनंतर आता उत्तराखंडमध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. पुष्कर धामी सरकारने १२ आयएएस आणि १८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. त्यासोबतच अनेक पीसीएस आणि सचिवालय सेवेतील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या या फेरबदलामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. बदलीसंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.
नैनिताल, उधम सिंग नगर, टिहरी, चमोली, पौरी आणि बागेश्वरसह अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने एकाच ठिकाणी बराच काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात याव्यात असे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर धामी सरकारने हा निर्णय घेतला. अर्पण यदुवंशी यांची नैनितालचे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयपीएस मणिकांत मिश्रा यांची उधम सिंग नगरचे, देवेंद्र पिंचा यांची पौरीचे आणि सरिता डोबाल यांची टिहरीचे, अमित श्रीवास्तव यांची चमोलीची आणि जगदीश चंद्र यांची बागेश्वरचे एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयएएस अधिकारी लालरिन लियाना फनाई यांची उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी दिलीप जावळकर यांना वित्त विभागाच्या सचिव पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. आयएएस अधिकारी रणजित कुमार सिंग यांची शिक्षण विभागाच्या सचिवपदी, तर ब्रिजेश कुमार संत यांची क्रीडा आणि युवा कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. आयएएस अधिकारी राजेश कुमार यांना औद्योगिक विकास आणि खाणकाम विभागाचे सचिव आणि खाणकाम विभागाचे महासंचालक या पदांवरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. युगल किशोर पंत यांची तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयएएस रीना जोशी यांची कामगार विभागात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयएएस विनीत कुमार यांची जलसंपदा आणि अल्पसंख्याक कल्याण विभागात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयएएस मनुज गोयल यांची वित्त विभागात अतिरिक्त सचिवपदी, मेहरबान सिंग बिष्ट यांची गृह विभागात अतिरिक्त सचिवपदी आणि आयएएस अभिनव शाह यांची सहकारी विभागात अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. आयपीएस अमित सिंग यांच्याकडून क्रीडा आणि युवा कल्याण विभागाचे विशेष प्रधान सचिव पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.