मुंबईवरील दहशतवादी हल्ला प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा यानं राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत खळबळजनक माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. पाकिस्तानी सैन्याचा सर्वात विश्वासू एजंट असल्याची कबुली देतानाच, हल्ल्यावेळी मुंबईत होतो आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची रेकी केल्याचंही राणानं चौकशीत सांगितलं. एनआयएच्या चौकशीत राणानं दिलेल्या कबुलीबाबत कुणीही अधिकृतपणे सांगितलेले नाही.
२६/११ ला मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाचं नुकतंच अमेरिकेहून प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, तहव्वूर राणाची एनआयएमार्फत चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत त्यानं खळबळजनक कबुली दिली आहे. पाकिस्तानी सेनेचा सर्वात विश्वासू एजंट असल्याची कबुली त्याने दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. डेविड हेडलीसोबत पाकिस्तानच्या लश्कर ए तोयबासोबत अनेकदा ट्रेनिंग सेशनमध्ये सहभाग घेतला होता. तसेच लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेनं गुप्तहेर नेटवर्क म्हणून यात महत्वाची भूमिका बजावली होती, असंही राणानं सांगितलं.
तहव्वूर राणा हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार डेविड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानीचा सर्वात जवळचा साथीदार तहव्वूर राणाला ४ एप्रिलला अमेरिकेच्या न्यायालयाकडून प्रत्यार्पणविरोधात फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर भारतात आणण्यात आलं होतं.
सूत्रांच्या माहितीनुसार, तहव्वूर राणा हा दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबईतच होता. या हल्ल्यात तोही सामील होता, अशी कबुली त्याने चौकशीत दिली आहे. त्याने सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर ठिकाणांची रेकी केली होती. खलीज युद्धावेळी तर पाकिस्तानच्या सैन्यानं त्याला सौदी अरेबियाला पाठवलं होतं, अशी कबुलीही राणाने दिली आहे.
हेडली आणि लश्कर ए तोयबा आणि हरकत उल जिहादी इस्लामी (HUJI) चे म्होरके आणि पाकिस्तानस्थित अन्य सूत्रधारांच्या साथीने मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या कट रचल्याचा आरोप राणावर आहे. पाकिस्तानमधून सागरी मार्गाने आलेल्या १० दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत आल्यानंतर सीएसएमटी, आलिशान हॉटेल आणि एका अन्य सेंटरवर हल्ला केला होता. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र तब्बल ६० तास दहशतीत होता. या दहशतवादी हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिक मारले गेले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.