महाराष्ट्रात टॅलेंटची काही कमी नाही, असं म्हणतात. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील तरुणांना वेगवेगळ्या कला अवगत असतात. देशातील तरुणांनी संपूर्ण जगभरात आपले नाव कमावले आहे. नुक्त्यात पार पडलेल्या व्हिएन इंटरनॅशनल आर्ट फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या तरुणींनी नाव कमावले आहे.
व्हिएना इंटरनॅशनल आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये गाण्याची स्पर्दा ठेवण्यात आली होती. ५ ऑगस्ट आणि १० ऑगस्टला ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत भारतीय तरुणींनी उत्तम कामगिरी केली आहे. भारतातील तरुणांना २ रौप्य आणि २ कांस्य पदकांवर आपले नाव कोरल कोरले आहे.
इरा शिंदे आणि वंशी मुदालियर असं जिंकलेल्या स्पर्धकांची नावे आहेत. त्यांनी १०-१४ वर्षीय गटात पदक मिळवले आहे.अलभ्या कांबळे हिने कांस्य पदक मिळवले आहे. तर प्रतिभा कडू हिने १५-१९ वयोगटात पदक मिळवले आहे. भारतासीठा ४ पदके जिंकून या तरुणींनी देशाचे नाव मोठे केले आहे.
अलभ्या(Alabhya) आणि वंशी (Vanshi) या मूळच्या मुंबईच्या आहेत तर प्रतिभा (Pratibha)आणि इरा (IRA) या पुण्याच्या आहेत. या चारही मराठमोळ्या पोरींनी परदेशात महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. त्यांनी गाण्याच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत ४ पदके आपल्या नावावर केली आहेत. व्हिएना इंटरनॅशनल आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळ्या देशातील स्पर्धक भाग घेतात. आपल्या देशातील कलांना ते जगभरात नेण्याचा प्रयत्न करतात. याच गाण्याच्या स्पर्धेत मराठमोळ्या मुलींनी ४ पदके जिंकत आपले नाव मोठे केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.