देश विदेश

Maharashtra Weather: राज्यात हवामानाचं 'कॉकटेल'; एकीकडे अवकाळी पावसाचा अलर्ट, दुसरीकडे उष्णतेच्या लाटा

Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात मोठा बदल झालाय. पुढील चार दिवसात अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.

Bharat Jadhav

राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहेत. एकाबाजुला सूर्य आग ओकतोय तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. आज हवामान विभागाने विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तलीय. तर अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय.

येत्या चार दिवसात अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेचा अलर्टही देण्यात आलाय. विदर्भात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. हिंगोली, परभणी, नांदेड, बीड ,जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.

हवामान विभागाकडून अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड ,लातूर, धाराशिव, सोलापूर ,सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिलाय. सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ होतेय. यात नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा ४३ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय. पॅरा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांच्या जनजीवनावर होतानाचा पाहायला मिळत आहेत. दरम्यान वाढत्या तापमानामुळे नंदुरबार जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ झालीय. नंदुरबारसह धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तापमान ४२ अंशाच्या वर कायम आहे.

वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे उन्हाचा वाढत्या तीव्रतेमुळे तालुक्यातील आंबा आणि काजू फळ पिकाला फटका बसलाय. तापमान वाढल्याने उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT