Pavana Dam : पिंपरी चिंचवड, मावळवर पाणी टंचाईचे सावट; पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा

Maval News : मावळ तालुक्यातील पवना धरण हे सर्वात मोठे धरण असून त्यातून पिंपरी चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहती ग्रामपंचायतच्या पाणी योजना व शेतीसाठी पाण्याचा वापर केला जातो
Pavana Dam
Pavana DamSaam tv
Published On

मावळ : राज्यात वाढत असलेल्या पाणीटंचाईचे सावट आणखीन गडद होत चालले आहे. धरणातील पाणी साठा कमी होत चालल्याने हि समस्या निर्माण झाली असून पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात देखील आता अवघा ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मावळ तालुक्यातील पवना धरण हे सर्वात मोठे धरण असून त्यातून पिंपरी चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहती ग्रामपंचायतच्या पाणी योजना व शेतीसाठी पाण्याचा वापर केला जातो. पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा धरणात झाला होता. मात्र उन्हाची तीव्रता अधिक असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात घट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार पवना धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. 

Pavana Dam
Latur Crime : मिरवणुकीवरून दोन गटात वाद; वादात मारहाण केलेल्या शिक्षकाचा मृत्यू, १० जणाविरुद्ध गुन्हा दाखल

पाणी जपून वापरण्याचे आवाहन 

मावळात यावर्षी कडक उन्हाळा जाणवत असून धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. पवना धरणात सध्या ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. अद्याप मे महिना बाकी असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. पावसाळा सुरू होऊन जलसाठा वाढेपर्यंत पाणी जपून वापरावे; असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Pavana Dam
IPL Online Betting : आयपीएल मॅचवर लाखोंचा सट्टा; पोलिसांची छापा टाकत बुकींवर कारवाई, तिघेजण ताब्यात

नाग्या-साक्या धरणात अल्प पाणी साठा शिल्लक
नाशिक
: नाशिक जिल्हयातील अनेक धरणांमध्ये ३५ ते ३६ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला असून तीव्र उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. यामुळे धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. नांदगाव तालुक्यातील नाग्या- साक्या मध्यम प्रकल्पात अल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या धरणातून अनेक गावांच्या पाणी योजना व शेतीच्या सिंचनासाठी पाणी त्याचा वापर होत असतो. मात्र पाणी साठा अत्यल्प शिल्लक असल्याने पुढील काही दिवसात धरणात मृत पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याने त्याचा परिणाम होऊन पाणी टंचाईची समस्या भेडसावणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com