Corona Update Saam tv
देश विदेश

Corona Update : कोरोनाचा पुन्हा उद्रेक? आरोग्य यंत्रणेची धाकधूक वाढली, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

corona update in marathi : कोरोनानं पुन्हा राज्याचं टेन्शन वाढवलंय.. एका दिवसात 4 जणांचा मृत्यूच झाला नाही तर नवे रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढलीय... नेमकी किती रुग्णसंख्या वाढली आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय... त्यातच आता एकाच दिवसात 4 रुग्णांचा मृत्यू आणि तब्बल 102 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 2 हजारांच्या घरात पोहचलीय.. तर कोरोना बळींची संख्या 25 वर पोहचलीय.. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणलेत. त्यामुळे याआधीच नागरिकांसाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.

सरकारच्या मार्गदर्शक सूचना

वृद्ध आणि रोग-प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरा

श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा, सर्वेक्षण करा

पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा

राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश

ऑक्सिजन, पीपीई कीट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा

एकीकडे आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झालेत.. त्यापार्श्वभुमीवर देशात XFG आणि जेएन 1 व्हेरिएंटचा शिरकाव झालाय.. तर देहूत कोरोनासदृश्य रुग्ण आढळून आलाय.. त्यामुळे वारीवर कोरोनाचं संकट असल्याचं म्हटलं जातंय.. तर आरोग्य मंत्र्यांनी मात्र नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय...

राज्यातील कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक 805 रुग्ण फक्त मुंबईत आढळून आलेत...त्यापाठोपाठ सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत.. त्यामुळे ऐन वारीच्या काळात कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत स्वत:ची काळजी घेणे हेच जास्त हिताचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT